ज्वारीच्या पिकावर ‘पोंगेमर’ 
मराठवाडा

ज्वारीच्या पिकावर ‘पोंगेमर’चा प्रादुर्भाव !

कृष्णा पिंगळे

सोनपेठ (जि.परभणी) : सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यावरील अस्मानी संकटांची मालिका संपत नसून अतिवृष्टी नंतर आता रब्बीच्या ज्वारीवर ‘पोंगेमर’(पोंगे अळी) चा प्रादुर्भाव पहावयास मिळत असल्याने बळीराजा चांगलाच धास्तावल्याचे चित्र आहे.

सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांवर गारपीट, दुष्काळ, बोंड अळी, लष्करी अळी यांचा सामना केल्यानंतर आता ज्वारीवर देखील खोड माशीच्या ‘पोंगेमर’ चा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. वातावरणात सातत्याने येत असलेल्या धुईमुळे या माशीचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. या माशीची पांढरी अळी ज्वारीच्या पोंग्यात शिरून रोपाच्या खालचा भाग खाऊन टाकत आहे. या अळीमुळे हजारो एक्कर ज्वारीवरील पोंग्याची मर झालेली पहावयास मिळत आहे. या किडीचा परिणाम रब्बी हंगामातील ज्वारीवर पीक वाढीच्या एक महिना कालावधीपर्यंत पहावयास मिळतो. यामुळे ज्वारीच्या धान्याचे चाळीस ते पन्नास टक्के तर कडब्याचे पस्तीस टक्के नुकसान होते.

मजूर लावून पोंगे काढावे लागतात
या ‘पोंगेमर’वर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर लावून बाधित पोंगे काढून घ्यावे लागत आहेत. तसेच जैविक व रासायनिक औषधांचा वापर करावा लागत आहे. मक्यावर आलेली लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांनी ते पीक काढून टाकून अनेक ठिकाणी ज्वारीची पेरणी केली होती. परंतू, आता ज्वारीवर देखील ‘पोंगेमर’चा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालकांमध्ये जनावरांच्या वैरणीसाठी चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पोंगेमरमुळे ज्वारी व कडब्याच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात खोल नांगरट करूनच रब्बी ज्वारीची पेरणी करावी. ज्वारीमधील पोंगेमर झालेली रोपे उपटून नष्ट करावीत.
दहा टक्के पानावर छिद्र किंवा दहा टक्के पोंगेमर आढळून आल्यास दहा लिटर पाण्यात ५०० मिली निंबोळी अर्क, क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली, सायपरमेथ्रीन दहा टक्के प्रवाही २० मिली, डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही १२.५ मिली तर क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली या कीटकनाशकांचा वापर करून फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना कीटकनाशके हे पोंग्यात जातील याची काळजी घ्यावी.
-गणेश कोरेवाड - तालुका कृषी अधिकारी

 


महागडे औषधेही फवारावे लगते

ज्वारीच्या पहिल्या पेरी नंतर पन्नास टक्के ज्वारीवर पाळी घालून दुसऱ्यांदा ज्वारी पेरली. परंतू, त्यावरही पोंगेमर दिसून येत असल्याने मजुरा करवी मर लागलेले पोंगे काढावे लागत आहेत. तसेच महागडे औषधेही फवारावे लागत आहेत.
-प्रशांत देशमुख, शेतकरी (पशुपालक)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

New Marathi Books : मराठी वाङ्‍मयाचा वारसा आणि वर्तमान ; दुर्मीळ ग्रंथ, ध्यानमार्गदर्शन व स्त्रीमनाच्या कवितांचा नवा पुस्तकमेळा

Marathi News Live Updates : संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा दिल्ली पोलीसांकडून सखोल तपास सुरू

AUS vs BAN: बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! मिचेल स्टार्कचा कहर, अवघ्या २ दिवसांत कसोटी जिंकत १-१ ने बरोबरीत

SCROLL FOR NEXT