file photo 
मराठवाडा

त्या खून प्रकरणाला गती मिळण्याची शक्यता; दोन संशयितांना मध्यप्रदेशातून अटक

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर ( जिल्हा नांदेड ) :  येथील नऊ वर्षीय बालिकेच्या खून प्रकरणाला आता गती मिळून यामध्ये दोन संशयितांना मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे या खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्थान राज्यातील बारामुल्ला जिल्हा टोक येथील काही कुटुंबीय उदरनिर्वाह करण्याच्या निमित्ताने आखाडा बाळापुर परिसरातील कामठा फाटा शिवारामध्ये वास्तव्यास आले होते. येथील परिसरातील लोकांचे मनोरंजन करुन त्यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबातील नऊ वर्षीय बालिका रेश्मा गुड्डू शहा हिचा खून करुन तिचे प्रेत विहिरीत टाकण्यात आले होते. यानंतर तब्बल नऊ दिवसानंतर सदर बालिकेचे प्रेत कामठा फाटा शिवारातील एका विहिरीत सापडले होते. त्यानंतर सदर बालिकेच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचे दिसून आल्याने अज्ञात व्यक्तीवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हा उलगडण्याचा प्रयत्न करत होते. तसेच परिसरातील व त्या कुटुंबाच्या नातेवाईकांची असे जवळपास १७० जनाचे हाताचे ठसे घेतले होते. सदर बालिकेचा खून झाल्यानंतर या कुटुंबियाच्या सोबत असणारे युवक गायब झाले होते. सदर प्रकारानंतर पळून गेलेल्या दोन युवकावर संशयाची सुई आलेली होती. तसेच त्या दोन्ही युवकांनी आपल्याजवळील मोबाईलचे सिमकार्ड बंद करुन पळून गेले होते. या दोन तरुणाचा शोध घेण्यात पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली परंतु मिळत नसल्याने शेवटी खबऱ्यामार्फत मध्यप्रदेश राज्यातून नरसिंगपूर गावच्या जवळून या दोन जणांना अटक केले आहे. त्यांना सोबूत घेऊन पथक आखाडा बाळापूरकडे रवाना झाले आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT