zp hingoli 
मराठवाडा

येथील सत्ताही महाविकास आघाडीच्याच हाती

मंगेश शेवाळकर

हिंगोली: राज्‍यात सत्ता स्‍थापनेचा पेच सुटल्‍यानंतर मिनी मंत्रालय म्‍हणून समजल्‍या जाणाऱ्या जिल्‍हा परिषदेत दुसऱ्या टप्‍प्‍यातही पुन्‍हा एकदा महाविकास आघाडी एकत्र येणार असल्‍याच्‍या हालचाली सुरू झाल्‍या आहेत. हिंगोली जिल्‍हा परिषदेत बावन्न सदस्य असून यामध्ये शिवसेनेचे पंधरा, राष्ट्रवादी बारा, काँग्रेस अकरा, अपक्ष तीन, तर भाजपचे अकरा सदस्य आहेत. 

जिल्‍हा परिषदेत सुरुवातीच्‍या अडीच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी सत्ता स्‍थापन केली. अध्यक्षपदी शिवसेनेच्‍या शिवराणी नरवाडे; तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल पतंगे यांची निवड झाली. याशिवाय शिवसेनेला एक, राष्ट्रवादीला एक, तर काँग्रेसला दोन सभापतिपद देण्यात आले आहे. या वेळी राज्‍यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी झाली आहे. या महाविकास आघाडीचे परिणाम जिल्‍हा परिषदेत उमटणार आहेत. मिनी मंत्रालयाच्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यात महाविकास आघाडीच सत्ता स्‍थापन करणार आहे.

अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव
 जिल्‍हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. त्‍यानुसार शिवसेनेचे गणाजी बेले यांचा अध्यक्षपदावर दावा कायम आहे. राष्ट्रवादीमध्ये उपाध्यक्षपदासाठी चुरस सुरू झाली आहे. जिल्‍हा परिषद सदस्य मनिष आखरे व यशोदा दराडे यांच्‍यापैकी एका सदस्याला उपाध्यक्षपद मिळणार आहे. त्‍या दृष्टीने राष्ट्रवादीमध्येही हालचाली सुरू झाल्‍या आहेत. काँग्रेसकडे दोन सभापतिपद असून एक सभापतिपद कळमनुरी तालुक्‍याला द्यावे लागणार आहे. सध्या काँग्रेसच्‍या दोन सभापतिपदांपैकी एक पद औंढा तालुक्‍याला व दुसरे पद सेनगाव तालुक्‍याला आहे.

कळमनुरी तालुक्‍याला एक सभापतिपद मिळणार

यामुळे या वेळी कळमनुरी तालुक्‍याला एक सभापतिपद मिळणार आहे. त्‍यासाठी माजी खासदार ॲड. राजीव सातव व माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांपैकी कोणाच्‍या नावाला हिरवी झेंडी दाखवतात? यावरच सर्व चित्र अवलंबून असणार आहे.

जिल्‍हा परिषदेत राजकीय हालचालीना वेग
दरम्‍यान, जिल्‍हा परिषदेत राजकीय हालचालीना वेग आला असून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, जिल्‍हाध्यक्ष दिलीप चव्‍हाण पैकी कोणाच्‍या नावाला हिरवा कंदील दाखवणार? यावरच उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार आहे. पुढील काही दिवसांतच या बाबत अंतिम निर्णय होणार आहे. तसेच शिवसेनेकडूनही आमदार संतोष बांगर, जिल्‍हा परिषद गटनेते अंकुश आहेर यांच्‍या भूमिकेवरच एका सभापतिपदासाठी सदस्याची निवड होणार आहे. मात्र, शिवसेनेकडून महिला बाल कल्‍याण सभापतिपदासाठी जिल्‍हा परिषद सदस्य वैष्णवी घुगे यांचे नाव आघाडीवर आहे. जिल्‍हा परिषदेत सध्या तरी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पक्षांतर्गत एकमेकांच्‍या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय वरिष्ठ नेत्‍यांच्‍या गाठीभेटी वाढल्‍या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT