The power outage in Bhum city has caused damage to electrical equipment.jpg 
मराठवाडा

भूम शहरात मंदिराच्या कळसावर कोसळली वीज

अब्बास सय्यद

भूम ( उस्मानाबाद) : शहरातील कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंदिरावर वीज पडल्याने शिखराच्या कळसाचे नुकसान झाले. दरम्यान, परिसरातील घरांमधील वीज उपकरणांचेही मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडली.
 
येथे सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. पाऊस सुरू असताना मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट झाला. यावेळी कसबा येथील पुरातन श्रीकृष्ण मंदिराच्या शिखरावर वीज पडल्याने शिखराच्या तांब्याचा कलश पडून त्याचे टुकडे झाले तर काही प्रमाणात शिखराचा भाग ढासळला. परिसरातील घरांमधील वीज उपकरणांचेही मोठे नुकसान झाले.

यात अजय रमेश खंडागळे यांचा टीव्ही आणि पंखा, अमर चाऊस यांचा पंखा, महंमद चाऊस यांचा फ्रिज, जुमान चाऊस यांचा फ्रिज, इंनुस शेख यांचा टीव्ही पंखा तर आबा जाधव यांचा टीव्ही, पंखा तसेच आवद चाऊस यांचा पंखा, उबेद चाऊस यांचा पंखा यासह विविध नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT