file photo 
मराठवाडा

‘या’ जिल्ह्यात वार्षीक सरासरीच्या ९ टक्के पाऊस

कैलास चव्हाण

परभणी : परभणी जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली असून दररोज पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्यांना सुरवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षीक सरासरीच्या ९ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, रविवारी पावसाने झोडपून काढले.
यंदा जून महिण्याच्या सुरवातीपासून पाऊस पडत आहे. आधी आठ दिवस मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनचा पाऊस देखील जोरदार पडत आहेत. त्यामुळे अनेक भागात पेरण्यांना सुरवात झाली आहे. कपाशीची लागवड देखील वेगात केली जात आहे. सोयाबीन, मुग, उडीद, तुर पिकाची पेरणी सुरु झाली आहे. त्यामुळे शिवार माणसांनी फुलले असून सर्वत्र पेरण्यांची लगबग सुरु असल्याचे चित्र आहे. पावसाचे सातत्य राहील्यास सर्वच पेरण्या वेळेत पूर्ण होतील, असा अंदाज आहे.
या वर्षी जिल्ह्यातील पावसाच्या वार्षीक सरासरीमध्ये बदल झालेला आहे. आतापर्यंत जिल्ह्याची वार्षीक सरासरी ७७४ मिलीमिटर एवढी होती. त्यात आता वाढ करुन ८६८.६१ मिलीमिटर एवढी करण्यात आली आहे. ता.एक जूनपासून ते ता. १४ पर्यंत जिल्ह्यात ८१.५४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. ९.४ टक्के पाऊस वार्षीक सरासरीच्या पडला आहे.

हेही वाचा :​ अजूनही प्रवाशांची वाट बघतोय रिक्षावाला !


रविवारी दमदार हजेरी
शनिवारी रात्री काही मंडळात पाऊस पडला. जिंतूर, सेलु, पूर्णा, मानवत, परभणी, गंगाखेड तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळपासून आंधारुन आले होते. दुपारी बारा वाजता जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. परभणी शहर आणि परिसरात जोरदार तासभर पाऊस झाला. अन्य भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

रस्त्यावर गुडघाभर पाणी

सेलु, गंगाखेड, पूर्णा तालुक्यात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. परभणी शहरात तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वसाहतीमध्ये पाणी शिरले आहे. गांधी पार्क, गुजरी भाग, नारायण चाळ या सखल भागात रस्त्याने गुडघाबर उंचीने पाणी वाहत होते. परिसरातील नाल्या तुंबल्याने नालीतील पाणी देखील रस्त्याने वाहु लागले. बीएसएनएल कार्यालय ते प्रशासकीय इमारतपर्यंत असणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनरकांना कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा : प्रवेश पंधरवाड्याने शैक्षणिक सत्रास सुरवात


तालुकानिहाय झालेला पाऊस
तालुका    वार्षीक सरासरी   झालेला पाऊस

परभणी      ९६५.५७         ७४.६४
पालम       ८६०.९०         ८१.६८
पूर्णा          ९२७.९०         ७०.६०
गंगाखेड     ८६५.३०        ७१
सोनपेठ       ७९३.९०        ६०
सेलू             ८३७.५०      ८७.६०
पाथरी         ८९१.३३       ११३.६६
जिंतूर          ८५२.९६       ७६.३२
मानवत       ८५२.१०       ९६.३४
एकुण         ८६८.६१       ८१.५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT