मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड  sakal
मराठवाडा

उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड

मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड

सकाळ वृत्तसेवा

उदगीर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची मुदत संपत असल्याने नवीन अध्यक्ष होणार याकडे साहित्यिकांचे लक्ष लागले होते . पण आज मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी उषा तांबे यांचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला.

साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद रोटेशन पद्धतीने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्य परिषदेकडे असते. यंदा ते मराठवाडा साहित्य परिषदेकडे होते. त्या अंतर्गत कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली होती. दर तीन वर्षांनी हे अध्यक्षपद संबंधित विभागांकडे दिले जाते. त्यानुसार यावेळी हे अध्यक्षपद मुंबई साहित्य संघाकडे आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षांसाठी मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठाले पाटील यांच्या अध्यक्षपदाची मुदत गेल्या महिन्यात संपत होती. परंतु उदगीर येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, कार्यवाह म्हणून उज्ज्वला मेहेंदळे तर कोषाध्यक्ष म्हणून प्रकाश पागे यांची निवड करण्यात आली आहे.

महामंडळाच्या आजच्या बैठकीत माझे नाव निश्‍चित झाले आहे. येत्या एक मेपासून अध्यक्षपदाचा कार्यभार अधिकृतरित्या स्वीकारणार आहे.

- उषा तांबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT