karvai 
मराठवाडा

गोदामावर टाकला छापा, वाचा काय आढळले...

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर ः शहरातील जवाहर कॉलनीमधील एका गोदामावर पोलिसांनी छापा टाकून तीन लाख सेहेचाळीस हजार सातशे साठ रुपयांचा गुटखा व सुंगधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (ता.पाच) रात्री एकच्या सुमारास केली.

गुटखा साठवणूक केल्याची गुप्त माहिती समजल्यावरून दोन पोलिस पथकांनी एकत्रितपणे जवाहर कॉलनी मधील एका घरावर छापा टाकला. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या पुड्यांचा अवैधरित्या साठा आढळून आला. 

एकास घेतले ताब्यात 
पोलिसांनी या साठ्यासह तेथील रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्यासह एकूण तीन लाख सेहेचाळीस हजार सातशे साठ रुपयांचा माल जप्त करून सचिन कैलासआप्पा लकडे या पस्तीस वर्षीय तरुणास ताब्यात घेतले. त्याने यात आणखी दोघांची नावे पोलिसांना सांगितली. पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत. 

संशयितास हजर केले पेलिस ठाण्यात 
सहायक पोलिस निरीक्षक कच्छवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. दरम्यान, छाप्याची माहिती समजताच अन्न व औषध भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी येथील पोलिस ठाण्यात भेट दिली. संशयित सचिन कैलासअप्पा काकडे यास पथकाने ताब्यात घेवून चौकशीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यात हजर केले. 

यांनी केली कारवाई 
कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या आदेशावरून सहायक पोलिस निरीक्षक एच.जी.पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक कच्छवे, जमादार रेड्डी व स्थानिक पोलीस ठाण्याचे फौजदार शेख अहमद यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी (ता.पाच) रात्री एकच्या सुमारास केली. 


कारवाई उरल्या नावालाच 
शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी प्रतिबंधित केलेला विविध प्रकारचा गुटखा, सुगंधित मसालायुक्त तंबाखूजन्य पदार्थांवर शहरात विक्रीसाठी कधी प्रतिबंध दिसला नाही. त्यामुळे गल्ली-बोळातील दुकांनासह बहुतेक किराणा दुकान, पानपट्टी इत्यादी ठिकाणी गोवा, विमल नावाच्या गुटख्यासह सर्व प्रकारच्या गुटख्याच्या, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या पुड्या ग्राहकांना बिनदिक्कत उपलब्ध होतात. याकडे संबंधित जबाबदार यंत्रणा मात्र कानाडोळा करत असल्याचे दिसते. पोलिस अधूनमधून गुटखा माफियाविरुद्ध कारवाई करतात. पुढे तो जामिनावर सुटल्यावर पुन्हा तेच ‘येरे माझ्या मागल्या’ सारखी बनते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Credit Card यूजर्ससाठी दिलासा! आता बिल उशिरा भरलं तरी लगेच दंड नाही; RBI चा नवा नियम काय?

Pune news : टुरिस्ट व्हिसावर आले अन्... पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांचा धक्कादायक कारनामा, पोलिसांनी दिले देश सोडण्याचे आदेश

Aadhaar Design Change : आधार कार्डचा नवा अवतार! नाव-पत्ता गायब; फक्त फोटो अन् QR कोड, कशी आहे नवी डिझाईन? पाहा

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

SCROLL FOR NEXT