Prof. Dr. Sanjay Kamble esakal
मराठवाडा

लोकसभेतील यशामुळं 'मविआ'कडून इच्छुकांची भाऊगर्दी; उमरगा विधानसभा निवडणुकीसाठी 'या' नावाची जोरदार चर्चा

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीतून शिवसेना उबाठाचे ओमराजे निंबाळकर यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे.

अविनाश काळे

शिवसेना उबाठाकडून प्रा. डॉ. संजय कांबळे हे मैदानात उतरणार आहेत, त्यासाठी त्यांनी संपर्क सुरू केला आहे.

उमरगा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा आल्याने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या संभाव्य उमेदवाराच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. धाराशिव जिह्यातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाच्या (Umarga-Lohara Assembly Constituency) निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

गेल्या तीन टर्मपासून आमदार ज्ञानराज चौगुले (Shiv Sena Shinde Group) या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीतून शिवसेना उबाठाचे ओमराजे निंबाळकर यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. विशेषतः उमरगा -लोहारा विधानसभा मतदारसंघातून त्यांना ४३ हजाराचे मताधिक्य मिळाले.

या पार्श्वभूमीवर या मतदार संघातून शिवसेना उबाठाकडून इच्छुकांची संख्या वाढते आहे. इच्छुक असणारे गुंजोटीचे माजी सरपंच व निष्ठावंत शिवसैनिक विलास व्हटकर, सातलिंग स्वामी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतात. अशोकराजे सरवदे २०१९ च्या निवडणुकीपासून इच्छुक होते, परंतु त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. सध्या त्यांनी उबाठाकडे उमेदवारीची मागणी करताहेत. रमेश धनशेट्टी, विरपक्ष स्वामी यांच्या नावाचीही चर्चा होत आहे.

प्रा. डॉ. संजय कांबळे इच्छुक

शिवसेना उबाठाकडून प्रा. डॉ. संजय कांबळे हे मैदानात उतरणार आहेत, त्यासाठी त्यांनी संपर्क सुरू केला आहे. मूळचे उमरगा तालुक्यातील तुगाव येथील रहिवासी असलेले डॉ. संजय कांबळे हे कळंब येथील मोहेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत. मविआकडून त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक लढवली असून ते बँकेचे संचालक आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण उमरग्यात झाले असून महाविद्यालयीन जीवनात त्यांनी दलित चळवळीत सक्रिय काम केले आहे. रिपब्लिकन विद्यार्थी संसदेच्या निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थी चळवळीचे सक्रिय कार्य केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष, त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले असून जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम केले असून मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. उमरगा येथील दलित चळवळीत नेते (कै) प्रा. डी. के.(बापू) यांचे ते पुतणे आहेत. त्यांचे वडील तुगाव गावचे सरपंच म्हणून चांगले कार्य केले असून बालपणापासूनच त्यांना राजकीय धडे मिळाले आहेत. उच्य विद्याविभूषित व्यक्तीला उबाठा गटाकडून संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील असून जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील, जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नेते बाबा पाटील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

भूम, परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या सोबत त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे. दरम्यान, महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुलेच असतील. त्यांना टक्कर देणारा तगडा उमेदवार म्हणून डॉ. कांबळे यांच्या नावाची चर्चा होत असून येणाऱ्या काळात उमेदवारीसाठी आणखी कोणकोणते बदल होतील हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT