protest for demanding maratha reservation strict lockdown in ghansawangi city police marathi news  Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने; घनसावंगी शहरात कडकडीत बंद

चक्काजाम आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, या आंदोलनामुळे शहरातील काही शाळांनी सुट्टी

सुभाष बिडे

घनसावंगी : घनसावंगी शहरात (ता.३१) मंगळवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे सर्व रस्ते ठप्प झाले असून, शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरंगे पाटील यांची तब्येत सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे खालावत असल्याने संतप्त झालेल्या काही मराठा आंदोलकांकडून घनसावंगी शहरात तसेच तालुक्यातील अनेक भागात विविध आंदोलने करण्यात येत आहे. काल (ता.३०) सोमवारी देखील भोकरदन शहरात संत रामदास महाविद्यालय चौक व सुतगिरणी परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.

भाजप नेते सतीश घाटगे पाटील यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली त्या या कार्यालयाच्या नामफलकावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे नासधूस करण्यात आली. दरम्यान आमदार राजेश टोपे यांच्या कार्यालयाचे घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु

या ठिकाणी वाचमेन त्यांच्या कार्यालयावरील कर्मचारी व पोलीस असल्याने त्यांना घोषणाचा प्रयत्न केला दरम्यान काही मराठा आंदोलकांनी पेट्रोल अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी आमदार राजेश टोपे यांनी आरक्षणासाठी ठोस भूमिका घेण्याची मागणी घेतली केली दरम्यान पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीला आग लावली यात बांधकाम विभागाचे साहीत्य जळून खाक झाले. राणीउचेगाव येथे चक्काजाम आंदोलन केले.

आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने याचा परिणाम सलग दुसऱ्या दिवशीही परिणाम पाहायला मिळत आहे. मुख्य जाणाऱ्या रस्त्यावर टायरे जाळून, तसेच पाईप व इतर साहित्य रस्त्यावर आडवे लावून सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन करण्याचे आहे. सकापासूनच शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद आहे.

यावेळी आंदोलकांकडून "एक मराठा लाख मराठा" अशा जोरदार घोषणा देण्यात येत असून, राज्य सरकार व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . चक्काजाम आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, या आंदोलनामुळे शहरातील काही शाळांनी सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे–बंगळूर प्रवास आता फक्त सात तासांत! तब्बल 55 हजार कोटींचा नवा आठपदरी महामार्ग ठरणार गेमचेंजर, महाराष्ट्र-कर्नाटकातून जाणार मार्ग

Sugarcane Price Protest Video : कोल्हापुरात ऊसदर आंदोलनाचा भडका, शिरोळ तालुक्यात ऊस वाहतुकीची तीन वाहने पेटवली

Solapur Accident:'भावी अभियंत्याचा दुचाकी अपघातात मृत्यू'; सुट्टीला आल्यावर मरवडे रोडवर घटना, वडिलांचे स्वप्न संपलं

"असिस्टंट दिग्दर्शक म्हणून सचिन यांचं नावंही शोलेच्या यादीत नाही" ज्येष्ठ सिनेसमीक्षकाचा धक्कादायक खुलासा

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा'; उर्वरित ४७ टक्के शेतकऱ्यांच काय?

SCROLL FOR NEXT