Dadhegaon Zilla Parishad School  esakal
मराठवाडा

ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या पत्र्यावर बसून ग्रामपंचायत सदस्याचे आमरण उपोषण; काय आहे कारण?

दाढेगावमधील जिल्हा परिषद शाळा (Zilla Parishad School) मोडकळीस आलेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जोपर्यंत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे.

-अशोक चांगले

सुखापुरी : सुखापुरी (ता. अंबड) परिसरातील दाढेगाव ग्रामपंचायतीचे (Dadhegaon Gram Panchayat) सदस्य राजू दशरथ काकडे यांनी शाळेबाबत गटशिक्षणधिकाऱ्यांना १८ जून रोजी निवेदन दिले होते. मात्र, अद्याप त्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही.

त्या निवेदन म्हटले आहे, की दाढेगावमधील जिल्हा परिषद शाळा (Zilla Parishad School) मोडकळीस आलेली आहे. शाळेवरचे पत्रे पूर्णपणे गळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. जीर्ण झालेली ही इमारत कधीही कोसळू शकते. यात जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे.

मात्र, याबाबत अद्याप प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी पुन्हा प्रशासनाला निवेदन देत राजू काकडे यांनी शाळेच्या पत्र्यावर बसून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, गावातील ग्रामस्थ व तरुणांनी काकडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT