bjp aashti 
मराठवाडा

गृहमंत्र्यांच्या पुतळ्याला शंभर कोटींच्या नोटांचा हार; राज्य सरकारच्या विरोधात भाजपची निदर्शने

अनिरुध्द धर्माधिकारी

आष्टी (बीड): राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर भाजपच्या वतीने आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत आज (ता. 21) येथील शिवाजी चौकात गृहमंत्र्यांच्या पुतळ्याला शंभर कोटींच्या नोटांचा प्रतिकात्मक हार घालून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

पुरावे लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारे आहेत. यशवंतराव चव्हाण, लोकनेते गोपीनाथराव मुंडे, आर.आर.पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वकर्तृत्वावर निष्कलंकपणे काम करून गृहखात्याची मान उंचावली.

हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या बाबत मुख्यमंत्र्यांनी व पक्षाच्या प्रमुखांनी तत्काळ निर्णय घ्यावा व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पदावर राहू नये, अशी जनतेतून मागणी होत असल्याचे आमदार सुरेश धस यांनी या वेळी बोलताना सांगितले.

या वेळी युवानेते जयदत्त धस, महेंद्र गर्जे, बद्रीनाथ जगताप, माऊली जरांगे, गणेश शिंदे, सभापती दत्तात्रय जेवे, भारत मुरकुटे, रंगनाथ धोंडे, रमजान तांबोळी, अनिल ढोबळे , सुनील रेडेकर, किशोर झरेकर, अमोल शिंदे, विनोद रोडे, यशवंत खंडागळे, शफी सय्यद, अतुल कोठुळे, सागर धोंडे, अशोक ढवण, अक्षय धोंडे, जालिंदर पोकळे, विजय धोंडे, साधू हंबर्डे आदींसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT