file photo
file photo 
मराठवाडा

लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आले असुन प्राप्त झालेले कर्ज प्रकरणे मंजूर करुन पात्र लाभार्थ्यास तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांनी दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या उद्दिष्ट पूर्ततेचा आढावा मंगळवारी (ता. २२) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी डीएलसीसी बैठकीमध्ये घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बऱ्याच बँका या पीक कर्ज वाटपाचे कारण सांगून महामंडळाच्या कर्ज प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याच्या लाभार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व बँकांनी लाभार्थ्यांस कर्ज प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना त्याची पोहोच पावती देण्याचे निर्देश बँकांना दिले. तसेच महामंडळाकडुन प्राप्त होणारी कर्ज प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांस अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बँकांना दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना राज्यातील ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी करण्यात आली आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय

लाभार्थ्याना आपले कर्ज प्रकरण आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात सादर केल्यानंतर सदर कर्ज प्रकरणांची पडताळणी केली जाते. नंतर प्रकरण बँकेकडे शिफारस करण्यासाठी पाठविले जाते. बँकेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकरण महामंडळाकडे पाठविले जाते. त्यानंतर प्रकरणाची छाननी करुन महामंडळाकडून जिल्हास्तरावर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बीज भांडवल बँकेकडे वर्ग केले जाते आणि बँकेमार्फत लाभार्थ्यास कर्ज वितरण केले जाते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT