download 
मराठवाडा

कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेबाबत अभियान, कुठे ते वाचा...

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात गंदगी मुक्त गाव अभियान राबविण्यात येणार असून सर्व ग्रामपंचायतीने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. जिल्ह्यात (ता.आठ ते १५) ऑगस्ट या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांचा स्वभाव परिवर्तनाकरिता गंदगी मुक्त गांव अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.


अभियानाची सुरवात (ता.आठ) ऑगस्टला गावातील नागरिकांसोबत इ-संवाद बैठकीतून होणार आहे. (ता.नऊ) ऑगस्ट रोजी ग्रामस्तरावर पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकचे संकलन करुन वर्गीकरण करण्यात येणार आहे. (ता.१०) ग्रामस्तरावर शासकीय इमारतीची स्वच्छता करण्यात येणार आहे तसेच स्वच्छाग्रही मार्फत ओडीएफ प्लस दर्जाबाबत रॅपिड प्रो प्रणाली व आयपीआरच्या माध्यमातून टोल फ्री क्रमांक १८००१८०४०४ वरून प्रतिसाद नोंदविण्यात येणार आहे. (ता.११) ऑगस्ट रोजी स्वच्छतापर संदेश देणारे भिंतीचित्रे रंगवून जनजागृती करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट रोजी श्रमदानातून वृक्षारोपणाची मोहीम राबवायची आहे. १३ ऑगस्ट रोजी गंदगी मुक्त मेरा गाव या विषयावर ऑनलाइन पेंटिंग स्पर्धा (इयत्ता सहावी ते आठवी) विद्यार्थ्यांसाठी तसेच याच विषयावर आॕनलाइन निबंध स्पर्धा (इयत्ता नववी ते बारावी) हा उपक्रम शालेय स्तरावर राबवायचा आहे. १४ ऑगस्ट रोजी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र यांची स्वच्छता करुन औषध फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण करावयाचे आहे. 

ग्रामसभामध्ये शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी गावामध्ये ग्रामसभामध्ये शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करुन ओडीएफ प्लस बाबत घोषणा करावयाची आहे. शौचालय बांधकामात राज्याचे व जिल्ह्याचे काम उत्कृष्ट ठरले आहे. गावाला शास्वत स्वच्छ टिकून ठेवण्यासाठी शौचालयाचे वापरासह परिसर स्वच्छता ठेवल्यास ग्रामीण भागातील नागरिकाचे आरोग्यमान उंचावेल, यासाठी हे अभियान उपयोगी पडेल.

अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा 
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या अभियानातील उपक्रम राबविण्यात यावे व ग्रामपंचायतमधील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेऊन घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आत्माराम बोंद्रे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व कर्मचार्यानी पुढाकार घेतला आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT