Beed Accident News esakal
मराठवाडा

Beed|पुण्यातून परतणाऱ्या रुग्णवाहिकेला कारची धडक; एक ठार,तिघे गंभीर

पुणे येथे रूग्णाला सोडून परत बीडला जात असलेल्या रुग्णवाहिकेला बीडवरून कोल्हापुरकडे जात असलेल्या भरधाव कारने जोराची धडक दिली.

निसार शेख

आष्टी (जि.बीड) : पुणे (Pune) येथे रूग्णाला सोडून परत बीडला जात असलेल्या रुग्णवाहिकेला बीडवरून (Beed) कोल्हापुरकडे जात असलेल्या भरधाव कारने जोराची धडक दिली. यामध्ये एक व्यक्ती ठार झाला, तर तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील (Ashti) सुर्डी फाट्यावरील वळणावर घडली. गंभीर जखमींना अहमदनगर (Ahmednagar) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (ता.२९) बीड येथून पुण्याला रूग्ण घेऊन गेलेली रूग्णवाहिका (एमएच२० ईजी ५१३०) रूग्णाला पोहोच करून बीडला परतत असताना बीडवरून कोल्हापुरकडे निघालेल्या भरधाव कारने (एमएच०९ बीएम ५९८६ ) आष्टी तालुक्यातील सुरुडी फाट्यावरील वळणावर समोरासमोर दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अवधुत गरगटे (वय ३१) हा जागीच ठार झाला असुन अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.(Beed Accident)

सदरील घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना मदत केली. उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बीड- नगर राज्य महामार्गावरील सुर्डी फाटा येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. रूग्णवाहिका चालक संतोष सुरवसे (रा.बीड) हा या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

Israel Election: इस्रायलच्या निवडणूक निकालात मोठा ट्विस्ट; 'बीबी' येणार की जाणार?

Marathi News Live Updates : नंदुरबार पंचायत समितीवर शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; अपमानास्पद वागणूक आणि प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले!

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

SCROLL FOR NEXT