file photo 
मराठवाडा

हिंगोलीत विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई, पन्नास हजाराचा दंड वसूल

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरातील प्रत्येक चौकात नगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे सोमवारी ता. २२  विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करुन पन्नास हजाराचा दंड वसूल केला आहे.

शहरातील महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, अग्रेसन महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह विविध ठिकाणी प्रशासनाच्या पथकाने कारवाई सुरु केली होती. 

सकाळपासून दुपारपर्यंत या नागरिकाकडून पथकाने प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे  ५० हजार रुपये दंड आकारला. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर तसेच वाहन चालक व सामाजिक अंतर न पाळणाऱ्यावर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून  प्रशासनाच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा तसेच सामाजिक अंतर पाळावे असे ध्वनिक्षेपकद्वारे जनजागृती करून आवाहन जात आहे. मात्र  अनेकजण तोंडाला मास्क बांधत नसल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात गर्दीच्या ठिकाणी देखील विनामास्क नागरिक दिसत आहेत. यामुळे  पथकाकडून शहरात  विनामास्क असलेल्या नागरिकांवर  धडक कारवाई केली जात आहे. 

दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सूचनेनुसार तहसीलदार पांडुरंग माचेवाड , मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे आदींनी पुढाकार घेत केली आहे. शहरात ही कारवाई सुरू असताना मास्क नसलेल्या नागरिकांची पळापळ सुरू होती. या कारवाईने आता नागरिक कोरोनाचे नियम पाळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT