कोमल रामराव माने  sakal
मराठवाडा

पूर्णा : नियतीनेही घेतली कोमलची परीक्षा

घरात वडिलांचे पार्थिव असतानाही दिला दहावीचा पेपर

सकाळ वृत्तसेवा

पूर्णा: ज्या वडिलांनी हाताचे बोट धरून चालायला शिकवले. गोष्टी सांगून स्वप्न पाहायला शिकवले त्यांचे अचानक निधन झाले. पण, अशा कठीण प्रसंगातही तिने वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सोमवारी (ता. चार) दहावीची परीक्षा देऊन कृतिशील श्रद्धांजली अर्पण केली. कोमल रामराव माने असे त्या धीरोदात्त मुलीचे नाव आहे. येथील रामराव माने यांचे रविवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना दोन मुली आहेत. एकीचे नुकतेच बाळांतपण झाले तर धाकटी कोमल येथील विद्या प्रसारिणी शाळेत दहावीत शिकते. वडिलांच्या अकस्मात निधनामुळे रडून-रडून रात्रभर तिचे डोळे सुजले होते.

ती गलितगात्र झाली होती. सोमवारी सकाळी तिचा दहावीचा भूगोलचा पेपर होता. तिचे चुलते राजू माने, सावता माने आणि चित्रकार रवी बिछडे यांनी तशा अवस्थेत तिचे मनोबल वाढवून तिला अंत्यविधीस उपस्थित न राहता परीक्षा देण्यास प्रवृत्त केले. सोमवारी एकीकडे वडिलांवर अंत्यसंस्कार सुरू होते तर दुसरीकडे कोमलने परीक्षा दिली. मुख्याध्यापक देवीदास उमाटे, केंद्रसंचालक प्रकाश रौंदळे आणि पर्यवेक्षक शिवाजी माखणे यांनी तीची परीक्षा होईपर्यंत संपूर्ण काळजी घेत व तिला धीर देत मानसिक आधार दिला. वडिलांचे पार्थिव घरात अन् कोमल पॅड व पेन उचलून परीक्षा केंद्राकडे निघाली ते दृश्य पाहून प्रत्येकजण गलबलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थांबायचं नाय गड्या...! अभिजीत दीपकेचा नवा Video, CJP आंदोलनाची सूत्र अजिंक्य शिंदेच्या हाती; कोण आहे तो?

IND vs WI, 3rd T20I: वैभव सूर्यवंशी बाकावरच! शिवम दुबे OUT नितीश रेड्डी IN; तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल Playing XI?

Shrirampur Accident: श्रीरामपूरमध्ये थरार! डंपरखाली चिरडली जाणार होती तरुणी, क्षणात बंपर पकडून वाचवला जीव; CCTV व्हिडीओ व्हायरल!

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या आजीचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके यांच्या अटकेने आईच्या अश्रूंचा बांध फुटला, वडिलांचाही संयम सुटला, सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT