औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे बारा दरवाजे उघडून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने यामुळे नदीला पूर आला आहे. त्याचे पाणी माथा गावाजवळील पुलावरून जात असल्याने बुधवार (ता.२९) औंढा -औरंगाबाद रस्ता बंद झाला आहे.  Aundha Nagnath-Aurangabad Highway
मराठवाडा

पूर्णा नदीला पूर, औंढा-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे (Siddheshwar Dam) बारा दरवाजे उघडून पूर्णा नदी (Purna River) पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने यामुळे नदीला पूर आला आहे. त्याचे पाणी माथा गावाजवळील पुलावरून जात असल्याने बुधवार (ता.२९) औंढा -औरंगाबाद रस्ता बंद झाला आहे. दोन तासांपेक्षा अधिक वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प असून वाहनांच्या लांबच लांब रांगा (Aundha Nagnath) लागल्या आहेत. पुलावरून दिवसभर रात्रभर पाणी जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांनी दिली आहे. तसेच आज सकाळी साडेदहा वाजता नदीचे पाणी माथा नदीच्या पुलावरून जात आहे. या ठिकाणी (Hingoli) महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन तळ ठोकून बसले आहेत. तसेच नागरिकांनी पुलावरून वाहन घेऊन जाण्याचे धाडस करू नये असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

यावेळी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाचे अधिकारी बसले आहेत. त्यामध्ये तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, सचिन जोशी, सरपंच माथा संजय कुटे, जमादार संदीप टाक, ज्ञानेश्वर कुटे, रंगनाथ कुटे, बालाजी मगर, पांडुरंग गीते, तलाठी विठ्ठल पुरी, संदीप डोंगरे, राघोजी कुटे, पोलीस कॉन्स्टेबल पिराजी पाचपुते या ठिकाणी हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ratnagiri Airport : एकाच वेळी 4 विमाने होणार पार्क! 72 आसनी विमानांसाठी रत्नागिरीत 25 एकरवर कसं उभं राहतंय विमानतळ? DGCA च्या परवानगीबाबत समोर आली मोठी अपडेट

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

SCROLL FOR NEXT