Purna Sugar Factory Election sakal
मराठवाडा

Purna Sugar Factory Election : दांडेगावकरांचे 'पुर्णा' वर एकहाती वर्चस्व, सर्व २१ संचालक निवडून आणत मिळवला मोठा विजय

शेतकरी विकास पॅनलचे नितीन जाधव यांनी ९४ मते घेत विजय मिळवला.

सकाळ वृत्तसेवा

वसमत : पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत कारखान्याची एकहाती सत्ता त्यांच्या हाती सोपवली. दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार मताधिक्याने निवडून आले.

मंगळवारी ता.११ येथील जुने तहसिल परिसरातील शासकीय गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शारदा दळवी, किशोर दुधमल यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिला निकाल उत्पादक सहकारी संस्था मधुन आला.

शेतकरी विकास पॅनलचे नितीन जाधव यांनी ९४ मते घेत विजय मिळवला. त्यानंतर एकापाठोपाठ एक शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले. यामध्ये वसमत गटातून जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, शंकरराव इंगोले, चुडावा गटातून डॉ सुनिल कदम, शहाजी देसाई,

गजानन धवन, पुर्णा गटातून भगवान धस, श्रीधर पारवे, बबन बेंडे, जवळा बाजार गटातून सुरेशराव आहेर, चांदू इंगोले, गजानन संवडकर , आडगाव -साडेगाव गटातून विश्वनाथ फेगडे, बालासाहेब बारहाते, प्रल्हादराव काळे, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात किशन देशमाने, महिला राखीव प्रवर्गात अंजनाबाई झुंजुर्डे, विमुक्त जाती जमाती प्रवर्गात हरिभाऊ शेळके, इतर मागास प्रवर्ग मध्ये ज्ञानोबा वंजे हे विजयी झाले आहेत.

यावरुन पुर्णा साखर कारखान्याच्या बाबतीत कोणतीच रिस्क न घेता पुन्हा सहकारातील तज्ञ व भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर मतदार सभासदांनी विश्वास दाखवला आहे. तत्पूर्वी एकुण २१५२० मतदारापैकी १७३७२ मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणी साठी पोलिस विभागाने तगडा बंदोबस्त नेमला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलुंडमध्ये रस्त्याच्या कामावेळी पुन्हा दुर्घटना, लोखंडी पिलर कारवर कोसळला

Pandharpur Corridor Project: पंढरपूर कॉरिडॉरची अर्थसंकल्पात घोषणा शक्य; पूर्वतयारी पूर्ण, ४ हजार कोटींच्या प्रकल्पाने बदलणार पंढरपूरचे रूप!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१४ ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीवर न्यायालयीन स्थगिती

Nafisa Begum Sattar Passes Away : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसाबेगम यांचे निधन; आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Solapur Accident: साेलापुरात टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील तिघे जागीच ठार; दुचाकी सुस्थितीत अन्‌ मृतदेह एकाच ठिकाणी, घातपाताची शंका!

SCROLL FOR NEXT