संग्रहित चित्र. 
मराठवाडा

परतूर शहरात १७ जणांचे क्वारंटाइन 

योगेश बरिदे

परतूर (जि.जालना) - मुंबईवरून रुग्णवाहिकेने परतूर शहरात बुधवारी (ता.२९) सायंकाळी दाखल झालेल्या ५ पैकी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ४ जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. इतर संपर्कातील परतूर येथील १७ तर सातोना येथील ११ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाहेद सय्यद यांनी दिली. 

मुंबई येथील वडाळा भागातून रुग्णवाहिकेतून शहरातील अक्षयनगर भागात बुधवारी सायंकाळी चार जण दाखल झाले होते, ते नातेवाईकाकडे थांबले असल्याची माहिती परतूर पोलिसांना गुरुवारी सकाळी मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तातडीने अक्षयनगर येथे जाऊन शहानिशा केली असता रुग्णवाहिकेत चालकासह इतर पाच जण मुंबईवरून आल्याचे आढळून आले. वरील सर्वांना तातडीने ताब्यात घेऊन जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी या पाच पैकी एका जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रात्री उशिरा प्रशासनाकडून परतूर शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची कारवाई सुरु करण्यात आली.

शनिवारी सकाळी शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह दुध विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आला होता. संचारबंदी अधिक कडक करण्यात आली होती. शहरात येणारे सर्व मार्ग सील करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथील मूळ राहिवासी आहे, मात्र गेल्या सात-आठ महिन्यापासून तो कामासाठी मुंबई येथे गेला होता. परतूर शहरातील इंदिरानगर रोडवर त्याची पत्नी राहते. बुधवारी मुंबईवरून आल्यानंतर परतूर शहरातील आपल्या सासूरवाडीत त्याने मुक्काम केल्याची माहिती आहे. शिवाय सातोना येथे रुग्णाचे आई-वडील राहतात. ते सातोना येथील कार भाड्याने घेऊन त्याला परतूर येथे भेटण्यास आले होते. ज्या व्यक्तीच्या कार मधून त्यांनी सातोना ते परतूर असा प्रवास केला त्या कार चालकाला देखील होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT