संग्रहित चित्र. 
मराठवाडा

दोन गटांच्या वादातून हवेत गोळीबार? 

उमेश वाघमारे

जालना - शहरातील नूतन वसाहत परिसरात गुरुवारी (ता.२३) रात्री दोन गटांच्या वादातून हवेत गोळीबार झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

शहरातील नूतन वसाहत येथे गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरा दोन गटांत वाद झाला. या वादातून हवेत गोळीबार झाल्याची चर्चा सुरू झाली.

याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व कदीम जालना पोलिस घटनास्थळी दाखल झाले; मात्र पोलिसांच्या हाती कोणी लागले नाही. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक चैतन्य एस. रात्री उशिरापर्यंत कदीम जालना पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. 

आधीही चार पिस्तूल जप्त 

विशेष म्हणजे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी (ता. २२) विदेशी बनावटीच्या चार पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना ताजी असताना नूतन वसाहतीत दोन गटांच्या वादात गुरुवारी हवेत गोळीबार झाल्याची चर्चा सुरू झाली. यापूर्वीही जालन्यात गावठी पिस्तूल पकडलेल्या आहेत. 

नूतन वसाहत येथे दोन गटांत वाद झाला; परंतु या ठिकाणी गोळीबार झाला की नाही, हे स्पष्ट नाही. याप्रकरणी तपास सुरू आहे. नेमके कारणही स्पष्ट नाही. याप्रकरणी पोलिसांची पथके तपासाकामी नेमण्यात आली आहेत. त्यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. 
- चैतन्य एस., पोलिस अधीक्षक, जालना. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : आवेश खानवर बंदीची कारवाई? अतिउत्साह महागात पडणार, लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज अडचणीत सापडणार

Gobar Tax: पाकिस्तानने गायी-म्हशीच्या शेणावरही लावला कर; जगभरात चर्चा, काय आहे गोबर टॅक्स?

Buldhana : अन्नातून विषबाधा, तीन चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू; आईवर उपचार सुरु...

Latest Marathi News live Update : दिव्यांग उमेदवारांचे आंदोलन; भरतीतील अन्यायाविरोधात संताप, आंदोलकाचा मृत्यू

Pune News : अमली पदार्थांचे विक्रेते, पुरवठादार व सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर; पोलिस आयुक्तांनी घेतली झाडाझडती

SCROLL FOR NEXT