file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्हा परिषदेतील २० गाळे बांधकामासाठी सव्वा कोटीचा निधी उपलब्ध

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या पाठीमागील परिसरात विस गाळे बांधकामासाठी एक कोटी विस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच या गाळे बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता लवेश तांबे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या वतीने पाठीमागील मोकळ्या जागेत विस गाळे बांधकाम करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला व तसा ठरावही पारित करण्यात आला. मात्र यावरही सर्वसाधारण सभेत सदस्यांचे एकमत होत नव्हते. काहींनी या गाळे बांधकामाला प्रकर्षाने विरोध दर्शविला होता. त्यानंतर मात्र गाळे बांधकामाला सर्वांनी आरोप, प्रत्यारोप करीत सहमती दर्शविल्याने गाळे बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.

मात्र मध्यंतरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या कामाला मुहूर्त मिळाला नाही. गाळे बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. यासाठी निविदाही काढण्यात आली असून या गाळ्याच्या बांधकामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात देखील काढले आहेत. परंतु कामे सुरु करण्यासाठी आचारसंहिता व कोरोना प्रादुर्भाव यांचा फटका बसल्याने कामाला सुरुवात करण्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मुद्रांक शुल्क, व विविध योजनेच्या  निधिवरील व्याज एवढा स्रोत आहे. आता इतर मालमत्तेवर जीपने विविध विकास कामे हाती घेतल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होईल. गाळे बांधकामाचे लवकर भूमिपूजन करून कामाला सुरुवात केल्यास  यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून जिल्हा परिषदेच्या शेषमध्ये निधी जमा होईल ,इतर कामे करण्यास वाव मिळणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT