file photo 
मराठवाडा

वाचा : का आहेत रब्बी पिके संकटात...

कैलास चव्हाण

परभणी : जिल्ह्यातील परभणीसह पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम या सहा तालुक्यांत रविवारी रात्री (ता. दोन) नऊच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत रब्बी पिकांना संकटात टाकले आहे. त्यामुळे गहू, ज्वारीसह तूर पिकाचे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. ढगाळ वातावरण राहत असल्याने दिवसभर अंधारून येत आहे. रविवारीदेखील सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. पहाटे काही भागात अंधारून आले होते. दिवसभर ढगाळ कायम राहिले. सायंकाळी काळेकुट्ट ढग जमा होऊन सात वाजता काही जिल्ह्यांतील भागात जोरदार पाऊस झाला.

सुमारे १५ मिनिटे पाऊस सुरू राहिल्याने सर्वत्र पाणीच झाले. पाऊस काही वेळ थांबल्यानंतर पुन्हा रात्री नऊच्या दरम्यान, पावसाला सुरवात झाली. परभणी शहरात पावसाचा जोर अधिक होता. ग्रामीण भागातदेखील पावसाचा जोर राहिला. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाचा जोर अधिक असल्याने काही वेळातच शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. नाल्यादेखील तुडुंब भरून रस्त्यांवरून वाहत होत्या. सोमवारीदेखील अनके रस्त्यांवर पाणी साचलेले होते. 

पावसाची मंडळनिहाय नोंद

परभणी शहरात १२, ग्रामीणमध्ये सात, झरी, दैठणा, पेडगाव, सिंगणापूर या मंडळांत एक मिलीमीटर पाऊस झाला. पालम तीन, चाटोरी दोन, बनवस पाच, गंगाखेड एक, राणीसावरगाव एक, माखणी १६, महातपुरी दोन, बाभळगाव एक, केकरजवळा पाच, असा एकूण सरासरी १.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात असून तूर पिकाची काढणी सुरू आहे. तर ज्वारी पोटऱ्यात आली आहे. गहूदेखील वाढीला लागलेला आहे. अशा अवस्थेत वातावरण मात्र, सातत्याने बदलत आहे. ढगाळ वातावरण सातत्याने राहत असल्याने हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होत आहे.

शेतकरी तूर काढत असताना पावसाने गोंधळ निर्माण केला आहे. रविवारी आलेल्या पावसामुळे कापणी करून ठेवलेली तूर भिजली आहे. पावसाचा पुन्हा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी सोमवारी कापणी केलेली तूर सुरक्षित ठिकाणी हलविण्याची घाई केल्याचे दिसून आले.

बहुतांष ठिकाणी ज्वारीचे कणसे भरण्याची अवस्था आहे. अशा वेळी पाऊस होत असल्याने ज्वारी काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच वारा आल्यास ज्वारी आडवी होण्याची भीती आहे. अनेक शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केलेल्या गव्हालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT