file photo 
मराठवाडा

कनेरगाव येथील जुगार अड्ड्यावर धाड; हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आठ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त

राजेश दारव्हेकर

हिंगोली : तालुक्यातील कनेरगाव नाका येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून सेनगाव तालुक्यातील सेनगाव ते हत्ता मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून दोन्ही कारवाईत आठ लाख ६९ हजाराचा ऐवज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त करुन चारजणाविरुद्ध सोमवारी (ता. २२)  गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सेनगांव व गोरेगाव येथे वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाईमध्ये सेनगाव ते हत्ता जाणारे रोडवर भानखेडा तांडा गावात वाळुची टिप्परने चोरटी वाहतुक करीत असतांना चालक बाळु चव्हाण रा. ब्राम्हणवाडा तांडा ता. औंढा हे अवैध्यपणे वाळू गौण खनिजाची विना परवाना चोरटी विक्रीसाठी वाहतुक करत असतांना चार ब्रास वाळु किंमती आठ लाख २० हजार रुपये सह मिळून आला. तसेच मल्हारी सांगळे टिप्पर मालक रा. रुपुर ता. औंढा यांचे विरूध्द पोलिस स्टेशन सेनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच गोरेगाव पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कन्हेरगाव नाका ते कानरखेडा गावाकडे जाणारे रोडलगत सार्वजनिक ठिकाणी राजु विसावे रा कन्हेरगाव नाका हा मटका जुगार खेळ खेळवत व खेळत आहे अशा खात्रीशीर माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून त्याचे कडून मटका जुगार साहित्य, दोन मोबाईल व नगदी रूपये असा एकूण ४९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून राजु विसावे व पांडुरंग गावंडे दोघे रा. कन्हेरगाव नाका यांचे विरूध्द  गोरेगाव येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांचे आदेशाने पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे शंकर जाधव, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT