file photo 
मराठवाडा

जवळा बाजार येथील जुगार अड्ड्यावर धाड, पावनेचार लाखाचा मुद्देमाल जप्त, तेरा जुगाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तीन लाख ७६ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन तेरा जुगाऱ्यांविरुद्ध रविवारी ( ता. २१)  हट्टा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार जवळाबाजार येथील सलीम खान पठाण यांच्या जागेत जुगाराचा अड्डा चालू आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी आरामशिन जवळ चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता तेथे  जुगार खेळणारे जुनेद मामू, बबलू शेख, पवन जयस्वाल सर्व रा. जवळा बाजार, संतोष  चव्हाण रा. आडगाव रंजे, सय्यद सत्तार सय्यद सरदार, शेख नईम शेख मोईन, नदीम शेख, आमदू पैलवान, नफिज पैलवान, जागा मालक सलीम खान पठाण सर्व रा. जवळा बाजार व इतर मोटार सायकल सोडून पळून गेलेले तीन लोक अशा एकूण १३ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या कडून रोख १० हजार १०० रुपये, पाच मोटारसायकल, चार मोबाईल असा तीन लाख ७६ हजार दोनशे रुपयाचा ऐवज जप्त करुन पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलिस ठाण्यात रविवारी तेरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस जमादार विशाल घोळवे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : जालन्यात मराठा समाज बांधवांची बैठक

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

Umarga Crime : तरुणाच्या खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक; उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

SCROLL FOR NEXT