beed sakal
मराठवाडा

Beed Crime News : कुंटणखान्यावर छापा ; आठ महिलांची सुटका

सहायक पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकून परराज्यातील आठ महिलांची सुटका केली. आंटीसह दोन ग्राहकांना पोलिसांना ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

बीड : सहायक पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकून परराज्यातील आठ महिलांची सुटका केली. आंटीसह दोन ग्राहकांना पोलिसांना ताब्यात घेतले. ही कारवाई बीड शहरातील पांगरी रोडवरील शाहुनगर भागात मंगळवारी (ता. ३०) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी केली.

सोजरबाई होणाजी खंडागळे (वय ७०, रा. शाहुनगर, बीड) असे पकडलेल्या आंटीचे नाव आहे. सोजरबाई ही आपल्या राहत्या घरीच कुंटणखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून माजलगावचे सहायक पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी सापळा लावला.

मंगळवारी रात्री पोलिसांनी दोन डमी ग्राहक पाठवून या कुंटणखाण्याचा पर्दाफाश केला. यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंडसह मुंबईतील आठ महिलांची सुटका करत दोन ग्राहकांना अटक केली. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कारवाईत सहायक पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक के. बी. माकणे, हवालदार ए. ए. नामदास, ए. एस. देशमुख, पी. डी. ढगे, एस. बी. थापडे, के. एस. कानतोडे, गणेश नवले आदींनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT