Agricultural Service Center Paithan esakal
मराठवाडा

जादा दराने कपाशी बियाणांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा; कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

वाणांची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना विक्री न करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापे टाकून धडक मोहीम राबविली.

सकाळ डिजिटल टीम

परवाना रद्द करण्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

आडुळ : पैठण तालुक्यातील कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Center Paithan) चालक कपाशीच्या विविध वाणाची जास्त दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी पैठण तालुक्याच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यात जादा दराने कपाशीचे बियाणे (Cotton Seed) विक्री करणाऱ्या, तसेच जास्त मागणी असणाऱ्या वाणांची उपलब्धता असूनही शेतकऱ्यांना विक्री न करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापे टाकून धडक मोहीम राबविली.

सदरील धडक मोहिमेत डमी ग्राहक पाठवून जादा मागणी असणाऱ्या कपाशी बियाण्याची चढ्या भावाने विक्री करताना पोरगाव (ता. पैठण) येथील पंचावतार कृषी सेवा केंद्रात कबड्डी वाणाचे ४७५ ग्रामचे एक पाकिट ज्याची मूळ किंमत ८६४ रुपये असतांना सदरील विक्रेत्याने बाराशे रुपयांना फोन पेद्वारे विकल्याने कृषी सेवा केंद्राची तपासणी करून दुकान सील केले.

परवाना रद्द करण्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, आडुळ कृषी मंडळ अधिकारी वल्लभ भोसले मंडळ यांनी केली.

अशा कारवाया तालुक्यात सुरुच राहणार असून कोणी कृषी सेवा केंद्र चालक बियाणे किंवा रासायनिक खताची जास्त दराने विक्री करीत असेल तर कृषी विभागाला किंवा मला वैयक्तिक कळवा सदरील दुकानावर छापा टाकून त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल.

-संदीप शिरसाट, कृषी अधिकारी, पैठण तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT