मराठवाडा

पळशीसह परिसरात परतीच्या पावसाचे थैमान

सुनील पांढरे

अंधारी (जि.औरंगाबाद) ः पळशी (ता. सिल्लोड) परिसरातील अंधारी, लोणवाडी, मांडगाव, उपळी, म्हसला परिसरात शुक्रवारपाठोपाठ रविवारी सोमवारी व मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

तोडणी करून शेतात ठेवलेली मकाची कणसे पाण्यात भिजल्याने अनेक ठिकाणी कणसांना कोंब फुटले आहेत. गेल्या आठवड्यात परिसरात ढगाळ वातावरण असल्याने मका सोंगणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. मात्र, शुक्रवारपासून परतीच्या पावसाने अधूनमधून जोरदार हजेरी लावल्याने मकाचा चारा पूर्णपणे भिजला आहे. परिसरात बहुतांश शेतकरी शेतीसह पशुपालन मोठ्या प्रमाणात करतात. मकाच्या कडब्याचा जनावरांसाठी चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिसरात पडत असलेल्या पावसाने मकाचा कडबा पूर्णपणे भिजला आहे. अजून एक दोन दिवस पाऊस असाच चालू राहिल्यास भविष्यात चाराटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT