मराठवाडा

वृद्ध रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन; पावसाच्या पाण्याने रस्ता बंद

पिंपरी खुर्द येथील दुर्दैवी घटना

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : येथून जवळच असलेल्या पिंपरी (खुर्द) येथील वृद्ध इसमाची तब्येत बिघडली होती परंतु पावसाच्या पाण्याने रस्ता बंद झाल्याने येण्या जाण्याची सोय नाही त्यात पावसाचे पाणी पुलावर आल्याने मार्ग बंद झाला होता. शेवटी नातेवाईकांनी कपड्याची झोळी करुन उपचारासाठी शेतातून नेत असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयात पोहचेपर्यंत वृद्धाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी ता.१८ घडली आहे. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील माजी उपसरपंच संभाजी माधवराव धांडे वय ७५ वर्ष यांची मागील चार ते पाच दिवसापासून तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी आखाडा बाळापुर येथे नेण्यासाठी जात असताना बाळापुर ते कानेगावच्या मध्ये असणाऱ्या ओढ्यावर असलेल्या पुलावरुन पाणी जात होते.रात्रीपासून तो मार्ग बंद झाला होता.

सोमवारी सकाळी बाळापूरला घेऊन येत असताना मार्ग बंद झालेल्या अडचण निर्माण झाली. शेवटी त्यांचे नातेवाईक गोविंद धांडे, रमा धांडे, पवन धांडे, किशोर धांडे, दिलीप धांडे, रवी इंगळे व आणि व्यक्तीनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संभाजी धांडे यांना कापडाच्या झोळी मध्ये टाकून शेतातून मार्ग काढीत दुसऱ्या रस्त्यावर आणून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पिंपरी खुर्द गावात जाण्यासाठी असलेल्या पुलांची उंची कमी असल्याने दर वर्षी पावसाळ्यात ओढ्याला आलेले पाणी पुलावर जमा होते. त्यामुळे सदरील मार्ग पावसाळ्यात बंद पडतो. यावर्षी देखील सततच्या पावसाने ओढ्याला आलेले पाणी पुलावरुन जात आहे. यामुळे हा मार्ग बंद झाला. यामुळे वृद्धाला वेळेवर उपचार मिळू शकले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात! IT सेक्टर दबावात; कोणते शेअर्स घसरले?

Highest Paying Jobs 2026: आयटीऐवजी ‘या’ क्षेत्रांत तिपटीने वाढली भरती; धक्कादायक अहवालात समोर आली आकडेवारी

Gram Panchayat Resolution: ७ वाजता टीव्ही बंद; साेलापूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावानं घातला नवा आदर्श, ग्रामपंचायतीचा एकमताने ठराव मंजूर!

'मराठी सिनेसृष्टीतील मी एकमेक अभिनेता...' प्रसाद ओकच्या नावावर दोन विश्वविक्रमांची नोंद, आनंद व्यक्त करत म्हणाला..'मला कधीच...'

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या; रंजना नागपूरकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण

SCROLL FOR NEXT