Rain in nanded parbhani hingoli river overflow flood bridge collapse ndrf  sakal
मराठवाडा

नांदेड, परभणी, हिंगोलीत दाणादाण

जिल्ह्यांत ओढे, नद्यांना पूर;पिकांचे नुकसान, एनडीआरफची मदत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड/परभणी/हिंगोली : हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. ओढे-नद्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला. काही ठिकाणी पूल खचले. नदी आणि ओढ्याकाठच्या शेतजमिनी पिकासह खरडून गेल्या. अनेक गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. अर्धापूर तालुक्यात एनडीआरफच्या पथकाने शनिवारी पुरात अडकलेल्यांची सुटका केली. हिंगोली जिल्ह्यांतील आठ गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र स्थलांतरित केले.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) रात्री आणि आज मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. शनिवारीही पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू होता. विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. तामसा नदीला आलेल्या पुरामुळे तामसा ते भोकर राज्य व राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. हिंगोली जिल्ह्यातील कयाधू, आसना आणि जलेश्वर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.

त्यामुळे नदी काठच्या आठ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. प्रशासनाने आज पहाटेपासून तत्काळ मदतकार्य करीत ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. परभणी जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.जिल्ह्याच्या अनेक भागांतील नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत.

सर्वत्र पाऊस

  • पाचोरा (जि. जळगाव) शहर व परिसरात पावसामुळे रस्ते, वसाहतीमध्ये पाणी साचले. भडगावमध्ये पूर्व हंगामी कापसाचे नुकसान होण्याची शक्यता

  • नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी वाहून गेला.

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट)

रायगड रत्नागिरी सातारा पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

पालघर मुंबई ठाणे सिंधूदुर्ग नाशिक कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT