उस्मानाबाद : शहरात झालेल्या पावसामुळे पंचायत समितीच्या आवारात असे पाणी साचले होते. सकाळ
मराठवाडा

Osmanabad Rain : उस्मानाबादसह जिल्ह्यातील काही भागात पाऊस

सयाजी शेळके

उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता. पाच) पावसाने Rain दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात Osmanabad आतापर्यंत ५८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पेरणी होताच पाऊस गायब झाला होता. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पिके कोवळ्या स्थितीत असल्याने पावसाची नितांत गरज होती. सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात दमदार, तर काही भागात तुरळक पाऊस झाला. शहरातही दुपारी सव्वा एकच्या सुमारास चांगला पाऊस झाला. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा पाऊस झाला. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. बलसूर व मुरूम परिसरात मध्यम स्वरूपाचा तर अंबरनंगर तांडा परिसरात जोरदार पाऊस झाला.rain in some parts of osmanabad and district

तुरोरीतही बराच वेळ पावसाची रिपरिप सुरु होती. इट (ता.भूम) Bhoom परिसरात पावसाचा शिडकावा झाला. लोहारा शहर परिसरात अर्धातास जोरदार पाऊस झाला. यानंतरही बराच वेळ रिपरिप सुरु होती. तुळजापूर परिसरासह नळदुर्ग परिसरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा तर उमरगा शहरात बराच वेळ पावसाची रिपरिप सुरू होती. परंडा शहर व जेवळी (ता. लोहारा) Lohara परिसरातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT