टेंभुर्णी : खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाच दरवाजांतून होणारा पाण्याचा विसर्ग.
टेंभुर्णी : खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाच दरवाजांतून होणारा पाण्याचा विसर्ग.  
मराठवाडा

खडकपूर्णातून विसर्ग, जालना जिल्ह्यातील गावांना दक्षतेचा इशारा 

संजय राऊत

टेंभुर्णी (जि.जालना) -  जाफराबाद- भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाने नद्या दुधडी भरून वाहिल्या, परिणामी पूर्णा नदीवर असलेल्या संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पात ७० टक्क्यांवर जलसाठा झाला. त्यामुळे प्रशासनाने दक्षता म्हणून खडकपुर्णा प्रकल्पाचे पंधरा दरवाजे शुक्रवारी (ता.२४) ३० सेंटिमीटरने उघडले आहेत. दरम्यान, बुलडाण्यासह जालना जिल्ह्यातील काही गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद, भोकरदन परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील खेळणा,केळणा,जीवरेखा,धामणा या नद्या दुधडी भरून वाहत आहेत.या नद्या ठिकठिकाणी पूर्णा नदीला मिळतात. यामुळे खडकपुर्णा प्रकल्पात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत आहे. खडकपूर्णा प्रकल्पात मागील वर्षाचा ५० टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी जून महिन्यातील दोन पावसानंतर या आठवड्यात ही दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे ५६०.०६ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या चोखासागर प्रकल्पात सद्यस्थितीत ७० टक्क्यांवर जलसाठा झाला आहे.

प्रकल्पाचे शुक्रवारी सकाळी पाच तर सायंकाळपर्यंत एकूण पंधरा दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाचे एकूण १५ वक्रद्वारे नदीपात्रात १७ हजार ८०० क्यूसेक एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.  खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्षाने देऊळगाव राजा, लोणार व सिंदखेड राजा येथील १९ गावांना तसेच जिल्हा प्रशासनाने जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील काही गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी,ब्रह्मपुरी, निमखेडा,आळंद या गावाच्या परिसरात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते. कुंभारझरी गावाच्या सखल भागात दरवर्षी पाणी येत असल्याने ग्रामस्थांना सजग राहावे लागते.धरणातून पाणी सोडल्याने या गावांतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 

दुथडी भरून वाहिली जीवरेखा

टेंभुर्णी परिसरात गुरुवारी सकाळी कोरडे वातावरण असताना दुपारी चार वाजे नंतर परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील ओढे नाले खळखळून वाहिले. तर येथील जीवरेखा नदी दुथडी भरून वाहिली नदीचे खोलीकरण झाले असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT