sakal
मराठवाडा

हिंगोलीत सलग सहाव्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस

पावसाने सोयाबीन काढणीस व्यत्यय आला असुन अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापणी केलेले सोयाबीन पावसाने भिजले आहे

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी ता. २५ सलग सहाव्या दिवशीही सकाळी आठ वाजता मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सुर्यदर्शन देखील झाले नाही पावसाची रिपरिप उशीरापर्यंत सुरुच होती. जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार असा सलग सहा दिवस पाऊस झाला. आज सकाळी सहा वाजता मेघगर्जना विजेचा कडकडाट व रिमझिम पाऊस झाला. नंतर आठ वाजता जोरदार पाऊस झाला तो उशीरापर्यंत सुरू होता. आज सकाळपासून सुर्यदर्शन देखील झाले नाही.

या पावसाने सोयाबीन काढणीस व्यत्यय आला असुन अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापणी केलेले सोयाबीन पावसाने भिजले आहे. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव तालुक्यात सर्वदुर झाला आहे. सतत होत असलेल्या या पावसामुळे नदी, नाले, ओढे, खळखळून वाहत आहेत. बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. विहिरीची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकात पाणी जमा झाल्याने या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सहा दिवसापासून होत असलेल्या पावसाने शेतातील कामे बंद झाली आहेत. शेतात जाण्यासाठी देखील अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT