मराठवाडा

मांजरा नदीला महापूर, परीक्षा देण्यासाठी जाणारे 90 विद्यार्थी अडकले

सकाळ वृत्तसेवा

मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने हाहा:कार माजवलाय. लातूर आणि उस्मानाबादमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीच्या 145 किलोमीटरचे पात्र पाण्याने भरले आहे. अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिकांचे नुकसान झालेय. परीक्षेला जाणारे मराठवाड्यातील विद्यार्थी पूराच्या पाण्यामुळे अडकले आहेत. लातूर-नांडेड मार्गावर असलेल्या मांजरा नदीला आलेल्या पूरमुळे नांदेडहून सोलापूरला जाणाऱ्या 80 ते 90 विद्यार्थ्यांना परीक्षेला हजेरी लावता येणार नाही. या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

आज, एमएचसीइटी आणि आरोग्य विभागाची परीक्षा होत आहे. त्यासाठी अनेक विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने निघाले होते. नांदेडहून सोलापूरला निघालेले जवळपास 80 ते 90 विद्यार्थी पूरस्थितीमुळे अडकले आहे. नांदेड-लातूर रस्त्यावर मांजरा नदीवरील पूराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी भातांगळी येथे अडकून पडले आहेत. ते परीक्षेला मुकणार आहेत. त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती सकाळच्या मार्फत केली आहे. मांजरा नदीला महापूर आल्यामुळे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. दोन्ही बाजूने वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोकांची दैनिय अवस्था झाली आहे. दुचाकीपासून ट्रकपर्यंत सर्व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पिके पाण्याखाली गेली आहेत.

पावसाळ्याचे पहिले अडीच तीन महिने कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला होता. पण, सप्टेंबरपासून मात्र पावसाने जोर कायम ठेवला आहे. दररोज पाऊस पडत आहे. यावर्षी मांजरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. रोज धरणाचे पाच सहा दरवाजे उघडून पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्ये देखील तुडूंब भरून वाहत आहेत. धरणातील पाणी तसेच इतर नदी नाल्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळे मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT