मराठवाडा

येत्या आठवड्यात 72 तास राज्यभर वृष्टी 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद -  मुळात पाऊसच कमी पडतो आणि मंगळवारी (ता.16) आभाळ चक्‍क निरभ्र झाले. पारा चढला आणि उन्हाने अंगाची लाही झाल्याचा अनुभव औरंगाबादकरांना आला. कमाल पारा 33 अंशांवर गेला होता. या आठवड्यात हवामानाची हीच स्थिती राहण्याची चिन्हे असून पावसाची शक्‍यता धूसर आहे. 

जुलै महिन्यात मोठा एकच पाऊस झाला. तिसरा आठवडा उगवला तरी अपेक्षित पावसाच्या धारा अद्याप कोसळलेल्या नाहीत. या तिसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्‍यता धूसरच असल्याची शक्‍यता डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम खगोल व अंतराळ केंद्र (एमजीएम)चे प्रमुख डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, रविवारपासून महाराष्ट्रात पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. रविवारी पूर्व मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर मात्र 22 ते 24 जुलैदरम्यान हा कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे तयार होताना संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचे श्री. औंधकर म्हणाले. पावसाची तूट भरून निघेल अशी खात्री नसली तरी मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता त्यांनी वर्तवली आहे. या पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्रात मात्र कमी राहणार असल्याचे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT