Rains in Hingoli have caused severe damage to sorghum crops.jpg 
मराठवाडा

हिंगोलीत मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यात मागच्या तीन दिवसापासून पावसाळी वातावरण असून रविवारी (ता. २१) भल्या पहाटे देखील मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसाने ज्वारी, हळद, गहू पिकाचे नुकसान झाले आहे. औंढा तालुक्यातील अनखळी भागात कापणी केलेली ज्वारी भिजली आहे.

जिल्ह्यात मागच्या तीन दिवसापासून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी देखील सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे काढणीस आलेल्या टाळकी ज्वारी, हळद, गहू पिकास अडथळा निर्माण झाला आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकाची काढणी सुरु केली आहे. तसेच गहू पिकाची देखील कापणी करून ठेवली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी, पोटा, बेरुळा, उंडेगाव या भागात टाळकी ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे.

सध्या या भागातील शेतकऱ्यांनी या पिकाची कापणी सुरू केली आहे. कापणी केलेले पीक जागेवरच आहे. अवकाळी पावसाने ज्वारीचे पिक भिजल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे ज्वारी काळी पडणार असून जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगात येणारा कडबा भिजला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.  तसेच आंबा पिकांचे देखील नुकसान झाले आहे. 

शनिवारी सकाळी ढगाळ वातावरण होते, त्यानंतर दुपारी ऊन पडले तर सायंकाळी परत ढगाळ वातावरण निर्माण झाले. रात्री मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या व ढगाळ वातावरण कायम होते. रविवारी सकाळपर्यंत मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. तसेच सकाळी देखील ढगाळ वातावरण कायम होते. या पावसामुळे रब्बीच्या पिकातील गहू, ज्वारी, हरभरा यासह काढणीस आलेली हळद व आंबा पिकांचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

दरम्यान, जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावे टाळकी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. यात उंडेगाव, अनखळी, पोटा, बेरुळा, साळना, रामेश्वर, उखळी आदी गावाचा समावेश आहे. जिल्ह्यात या गावातील टाळकी ज्वारीला चांगली मागणी असते. त्यामुळे या गावातील शेतकरी हमखास टाळकीचे पीक  घेतात त्यांना ज्वारीच्या विक्रीसह जनावरांना चारा म्हणून ज्वारीचा कडबा विक्रीसाठी मिळतो. मात्र अवकाळी पावसाने कापणी केलेले ज्वारीचे पीक भिजले असल्याचे शेतकरी भास्कर संबरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: मोठी बातमी! २६ वर्षात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार

MCA CET Registration : २०२६-२७ साठी एमसीए व एम.एचएमसीटी सीईटी अर्ज सुरू!

Fake FASTag Annual Pass : सावधान! बनावट ‘फास्टॅग वार्षिक पास’ने सुरू आहे फसवणूक; ‘NHAI’ने दिला इशारा

कधी सुरू झाली कधी संपली कळलंच नाही! ३ महिन्यात स्टार प्रवाहची मालिका ऑफ एअर; 'या' दिवशी असणार शेवटचा भाग

VIRAL VIDEO: “गलत करते हो यार…” रोहित शर्मा संतापला; चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावला, मुंबई विमानतळावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT