rajesh tope rajesh tope
मराठवाडा

राजेश टोपे म्हणतात, ‘राष्ट्रवादी’ने स्वबळाची भाषा केली नाही

काही हॉस्पिटलनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिलेला नाही

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही स्वबळाची भाषा केलेली नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी शुक्रवारी (ता. १८) येथे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देत आहेत. ‘स्वबळा’बाबत पत्रकारांनी विचारणा केली असता टोपे यांनी हे मत व्यक्त केले.

प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा. तसा अधिकार सर्वांना आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीही स्वबळाची भाषा केलेली नाही. स्वबळावर लढायचे की आघाडी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतात. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेच अंतिम निर्णय घेतात. स्वबळाच्या चर्चेमुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. अगदी विश्वासाने हे शासन सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची-
काही हॉस्पिटलनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिलेला नाही. यासंदर्भातजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित हॉस्पिटलची चौकशी करावी, दोषी आढळल्यास रक्कम संबंधित हॉस्पिटलकडून वसूल करावी, ती रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावी, असेही टोपे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT