Raju chapke 
मराठवाडा

गरजूंच्या मदतीला धावले शिवसेनेचे राजू चापके

पंजाब नवघरे

वसमत (जि. हिंगोली): येथील शिवसेनेचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद सदस्य राजू चापके यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्यासह अन्नदान केले जात आहे. तसेच त्यांच्या वडिलांकडे असलेल्या कामगारांना काम बंद असतानाही पगार दिला जात आहे. लॉकडाउनच्या काळात गरजूंना मदत मिळत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय, रोजगार ठप्प झाला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न गरजूंसमोर उभा राहिला आहे. गरजूंना मदत करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचे सदस्य राजू चापके यांनी केला. 

कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप

त्यांनी गरजूंना अन्नदान, अन्नधान्याचे वाटप करण्यात सुरवात केली. तसेच अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले जात आहे. या वेळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, तालुकाध्यक्ष बालाजी तांबोळी, शहराध्यक्ष काशिनाथ भोसले आदींची उपस्थिती होती.

किराणा साहित्याचा समावेश
 
 या वेळी गरजूंना डाळ, गहू, तांदूळ, साखर, खाद्यतेलाची पाकिटे तयार करून दररोज पन्नास ते शंभर जणांना घरपोच वाटप करण्यात येत आहेत. अनेक गरजूंना आटा वाटप करण्यात आला. गुरुवारी सकाळी वसमत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे नगरपालिका कर्मचाऱ्यासाठी मास्क देण्यात आले.

एक हजार मास्कचे वाटप

 उपविभागीय व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, पोलिस कर्मचाऱ्यासाठी पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक बी. आर. बंदखडके, पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी सहायक गटविकास अधिकारी बी. टी. शिंदे यांच्याकडे मास्क देण्यात आले. जवळपास एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले.

लॉकडाउनसंपेपर्यंत मदत

 तसेच लॉकडाउन संपेपर्यंत सर्व शासकीय कार्यालयात मास्कचे वाटप करणार असल्याचे राजू चापके यांनी सांगितले. तसेच नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर देण्यात आले. राखीव दलांच्या पोलिस कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी नाष्टा पोचविला जात आहे. 

काम न करताही कर्मचाऱ्यांना पगार

विशेष म्हणजे राजू चापके यांचे वडील शासकीय कंत्राटदार दत्तराव चापके यांच्याकडे असलेल्या १६० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता काम सुरू नसतानाही पगार दिला जात आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार व खासदार हेमंत पाटील, आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य सुरू आहे. लॉकडाउन संपेपर्यंत या कार्यात कुठेही खंड पडू देणार नाही.
- राजू चापके, जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT