file photo
file photo 
मराठवाडा

राज्यराणी आजपासून नांदेडहून धावणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : हजूर साहेब नांदेड - मुंबई छत्रपती टर्मीनल (सीएसएमटी)-  हजूर साहेब नांदेड राज्यराणी एक्सप्रेसचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना रेल्वे विभागाने डावलले.

रेल्वे बोर्डाने गाडी संख्या २२१०२/ २२१०१ मनमाड- मुंबई सी.एस.एम.टी.-मनमाड राज्यराणी एक्सप्रेसला हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकापर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे. या गाडीला नवीन नंबर देण्यात आला असून ही गाडी १७६११/१७६१२  हजूर साहिब नांदेड-मुंबई सी.एस.एम.टी.- हजूर साहिब नांदेड अशी धावेल. यानुसार ता. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन होईल. उद्घाटनाचा कार्यकम रात्री साडेनऊ वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर प्लाटफॉर्म एकवर सुरु होईल. या कार्यक्रमास शहरातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहतील.

हजुर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल 
ही गाडी ता. १० जानेवारीपासून रोज रात्री दहा वाजता नियमितपणे हजुर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि मुंबई सी.एस.एम.टी. येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून सात मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी संख्या 17612 मुंबई सी.एस.एम.टी. – नांदेड एक्सप्रेस मुंबई रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटाला ता. ११ जानेवारीपासून नियमित सुटेल आणि नांदेड रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून २० मिनिटाला पोहोचेल. या गाडीस १७ डब्बे असतील. ही गाडी आपल्या प्रवासात पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिकरोड, देवळाली, इगतपुरी, कसारा, कल्याण ज., ठाणे रेल्वे स्थानकावर थांबेल.

दुय्यम निबंधक कार्यालयाची ९२ लाखाची फसवणुक

नांदेड : मुदखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात १५९ ई- चलनाचे बनावट दस्तावेज तयार करुन शासनाची ९४ लाख २२ हजार ९० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मुदखेड पोलिसांनी दोघांविरुध्द फसवणुकीसह आदी कलमान्वये मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुदखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ता. २४ एप्रील २०१७ ते ता. १९ जानेवारी २०१९ या काळात पांडुरंग व्यंकट कुलकर्णी व रोहितसिंह बिसेन दोघेही रा. बिसेनगनर व्हीआयपी रोड, नांदेड या दोघांनी संगनमत करुन १५९ ई- चलन दस्ताऐवजामध्ये चलन हे बनावट करुन स्वत: च्या आर्थीक फायद्यासाठी चलन न वापरता दुसराच बनावट पर्याय उपलब्ध करुन बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये शासनाचा ९४ लाख २२ हजार ९० रुपयांचा महसुल बुडवून शासनाची फसवणुक केली. याप्रकरणी प्रभारी दुय्यम निबंधक शरद काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुदखेड पोलिसांनी दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास फौजदार नारायण शिंदे करीत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT