ramdan ramdan
मराठवाडा

रमजान ईदचा बाजार फुलणार, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

दोन दिवस खाद्य पदार्थ विक्री सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे

सकाळ वृत्तसेवा

लातूर: यावर्षीची रमजान ईद (ramdan eid) शुक्रवारी (ता. १४) साजरी होत आहे. यानिमित्त नागरिकांना खरेदी करता यावी यासाठी कडक निर्बंध (lockdown) असतानासुद्धा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी निर्बंधामध्ये सूट दिली आहे. या सणानिमित्त लागणाऱ्या खाद्य पदार्थांचा बाजार दोन दिवस सुरू ठेवण्यास त्यांनी परवानगी दिली आहे. या संदर्भात सोमवारी (ता. १०) त्यांनी एक आदेशही काढले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी ता. आठ ते १३ मे या कालावधीसाठी कडक लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. याची सध्या अंमलबजावणीही सुरू आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. काही प्रमाणात रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. यात आता शुक्रवारी रमजान ईद आहे. या सणाच्या निमित्ताने सूट देण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत.

या निमित्त ता. ११ व १२ मे रोजी सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत फक्त रमजान ईद सणाच्या खरेदीसाठी किराणा दुकाने, ड्रायफ्रुट, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटण विक्रीचे दुकाने, अंडी, मासे, बेकरी, दूध विक्री दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे; तसेच ता. १२ मे रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत केवळ हातगाड्यांवर फिरून फळांची विक्री, दूध विक्री, चिकन, मटण विक्री करता येणार आहे. या सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरीकांनी घराजवळच्या दुकानातून खरेदी करावी, होम डिलेव्हीरीला प्राधान्य द्यावे. शक्यतो खरेदीसाठी वाहनाचा वापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ग्राहकांची गर्दी होणार नाही यासाठी विक्री करणारे दुकानदार यांनी त्यांचे आस्थापनांसमोर ठरावीक अंतर ठेवण्यासाठी वर्तुळ आकाराचे चिन्ह करावे. जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर वस्तू, सामान आस्थापनेत दुकानातून विक्री करू नये. चंद्रदर्शनानंतर रमजान ईद शुक्रवारी (ता. १४) साजरी होणार असल्यास गुरुवारी (ता. १३) सायंकाळी ५ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत डायफ्रूट्स, फळविक्री, चिकन, मटण विक्री दूध विक्री सुरू राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT