Ramazan Eid Namaz Ausa News
Ramazan Eid Namaz Ausa News 
मराठवाडा

यंदाची 'ईद' आगळी वेगळीच, तराबिह बरोबर ईदची नमाजही घरातच

जलील पठाण

औसा (जि.लातूर) : कोरोनाच्या संसर्गाने अखिल मानवजातीचे जीवन जगण्याचे तंत्रच बदलले आहे. सर्वत्र टाळेबंदी आणि शारीरिक अंतरामुळे (सोशल डिस्टनसिंग) सण, वार, उत्सव एवढेच काय तर लग्न समारंभ सुद्धा मोजक्या लोकांत आणि सर्व सुरक्षा बाळगून शांततेत उरकावे लागत आहे. यंदाची रमजान ईद ही याला अपवाद नाही. महिनाभर रोजे (उपवास) धरल्यावर शेवटच्या दिवशी येणारी ही ईद मुस्लिम धर्मातील सर्वात महत्त्वाची ईद मानली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे ही ईदची नमाज घरातच अदा करावी लागली. गेल्या अनेक पिढ्यांनी या ईदची नमाज ईदगाह अथवा वेळप्रसंगी मशिदीत अदा केली. मात्र पहिल्यांदाच तराबिह बरोबर ईदची नमाज घरात अदा करावी लागली आणि तीही घरातील लोकांसोबतच.


यंदा कोरोनामुळे सर्वत्र ईदची नमाज घरात अदा करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. खरे तर ईदची ही नमाज गेल्या अनेक पिढ्यांनी इदगाह येथेच अदा केली आहे. ईदची नमाज झाल्यावर एकमेकांच्या गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. मात्र या ईदला सर्वांनी एकमेकाला समाज माध्यमातून शुभेच्छा दिल्या. घराघरात घरातील मंडळींनी ज्याला कुत्बा म्हणता येतो त्यांनी नमाज पढवली तर अनेकांनी चास्तची नमाज अदा करून ईद साजरी केली.

सोशल मीडियावर जरी शुभेच्छांचा वर्षाव होत असला तरी दरवर्षी सारखी मजा येत नसल्याचे अनेकजण बोलत आहेत. दरम्यान औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देताना म्हटले, कोरोनामुळे जगावर संकट आले आहे. या संकटातून भारतातील आणि जगातील लोकांना वाचविण्यासाठी अल्लाहकडे दुवा मागावी, यंदा भरपुर पाऊस होऊन धन धान्याची सुबत्ता यावी. कोरोनाचे हे संकट लवकर दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT