rana jagjitsinh rana jagjitsinh
मराठवाडा

महाविकास आघाडीकडे इच्छाशक्तीचा अभाव- राणाजगजितसिंह पाटील

आमदार पाटील म्हणाले, ‘‘आरक्षण मिळालेच पाहिजे, ही समाजाची भावना आहे. शासनाकडून न्यायालयात पुन्हा योग्य मांडणी होणे आवश्यक आहे

सकाळ वृत्तसेवा

लातूर: ‘‘आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या (maratha reservation) भावना जाणून घेण्यात येत आहेत. त्यानंतर दिशा ठरवली जाणार आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य शासन बरेच काही करू शकते. पण, महाविकास आघाडीकडे इच्छाशक्ती, निर्णयशक्ती, समन्वयाचा अभाव आहे. आरक्षण देण्याच्या संदर्भातील न्यायालयीन लढण्याची प्रक्रिया सुरू ठेवतच या समाजाच्या विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करावी’’, अशी मागणी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (rana jagjitsinh patil) यांनी शनिवारी (ता. पाच) येथे पत्रकार परिषदेत केली.

आमदार पाटील म्हणाले, ‘‘आरक्षण मिळालेच पाहिजे, ही समाजाची भावना आहे. शासनाकडून न्यायालयात पुन्हा योग्य मांडणी होणे आवश्यक आहे. राज्य व केंद्राकडून अपेक्षा आहेत; पण यात गल्लत होता कामा नये. राज्य शासनाचा अभ्यासपूर्ण अहवाल गेल्यानंतरच केंद्र शासनाची जबाबदारी पुढे येते. समाजाच्या अपेक्षा राज्य शासनापर्यंत पोचवण्यात येणार आहेत. पण, त्यापूर्वी शासनाने समाजाच्या विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी संस्था, शैक्षणिक शुल्क अनुदानासंदर्भात भरीव तरतूद करण्याची गरज आहे. पण शासनाकडे इच्छाशक्तीचा, निर्णयशक्तीचा तसेच समन्वयाचा अभाव आहे.

आरक्षणासंदर्भात पुनर्याचिका दाखल केलीच पाहिजे. गायकवाड आयोगाने परिश्रम करून माहिती गोळा केली होती. त्याचा अहवाल शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय त्रुटी सांगितल्या यावर लक्ष दिले पाहिजे. नवीन आयोग नियुक्त केला तर पुन्हा पहिल्यापासून अभ्यास करावा लागले. त्यापेक्षा गायकवाड आयोगाकडेच हे काम द्यावे’’, अशी मागणीही श्री. पाटील यांनी यावेळी केली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, युवा नेते अरविंद पाटील, गुरुनाथ मगे, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT