file photo
file photo 
मराठवाडा

सावत्र पित्याला 14 वर्षांची सक्तमजूरी

सुषेन जाधव

औरंगाबाद : तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणारा आणि कृत्याचा पत्नीने जाब विचारताच तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास 14 वर्षांची सक्तमजुरी व साडेतीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी बुधवारी (ता.21) ठोठावली. 


 औरंगाबाद जिल्ह्यातील पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, संबंधित मुलीच्या जन्मदात्या पित्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले व तो तिच्यासोबत पळून गेला होता. त्यानंतर मुलीच्या आईने शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी व्यक्तीशी लग्न केले होते. दरम्यान, मुलगी, तिची आई व शिक्षा ठोठावण्यात आलेला सावत्र पिता हे मिळेल ते मजुरीचे काम करुन गुजराण करीत होते. 16 सप्टेंबर 2016 रोजी तिघेही मुलीच्या मावशीकडे रस्त्याच्या कामासाठी पैठण तालुक्‍यातील गावात आले होते. दुसऱ्या दिवशी दिवसभर काम करुन रात्री तिघे मुलीच्या मावशीच्या घराच्या ओट्यावर झोपले होते. त्या रात्री सावत्र पित्याने संधी साधून मुलीवर दोनदा अत्याचार केला. 

मुलीने हिमतीने गाठले पोलिस ठाणे 

पतीच्या या दुष्कृत्याबद्दल संतप्त पत्नीने जाब विचारला असता, मुलीच्या सावत्र पित्याने त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुलीने आपली आई व मावशीसोबत पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीनंतर पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात मुलगी, तिची आई व मावशीसह डॉक्‍टरांचा जबाब महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने सावत्र पित्याला 14 वर्षे सक्तमजुरी व 2500 रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सक्तमजुरी, तर इतर कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून एम. आर. मोरे व डी. एस. भुरके यांनी काम पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT