Protest against MIM in Aurangabad
Protest against MIM in Aurangabad 
मराठवाडा

औरंगाबादेत "नो एमआयएम'; नागरिकांचा बहिष्कार 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : रोजाबाग परिसरातील नागरिकांनी आंदोलन करून "नो एमआयएमचे' फलक झळकावत निवडणुकीवर बहिष्कार घातला. विशेष म्हणजे, खुद्द खासदार इम्तियाज जलील या परिसरात राहतात. तरीही उमेदवारांनी प्रचारालाही येऊ नये, असे आवाहनच नागरिकांनी केले. या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत नागरी सुविधांची खोटी आश्‍वासने देऊन निवडणुकीनंतर पाठ फिरवलेल्या राजकारण्यांना वैतागलेल्या रोझाबाग परिसरातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. यासंबंधी वॉर्ड दहा रोजाबाग परिसरातील नागरिकांनी मध्य विधानसभा निवडणुकीसाठीच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देत, समस्या मार्गी न लागल्यास या प्रभागातील सहाही बूथवर सामुदायिक बहिष्काराचा इशारा दिला आहे. 

नागरिकांनी दिलेल्या या निवेदनात वॉर्डात पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजलाइन बदलणे, वॉर्डात पथदिवे व झुकलेले धोकादायक विद्युत खांब बदलणे, रोज कचरा उचलणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत या भागातील नगरसेवकाने एकही काम केले नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे वॉर्डातील नागरी समस्यांचे निराकरण तत्काळ करण्याची मागणीही त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर युनूस शहा, अब्दुल रऊफ, रशीद महेबूब पटेल, शेख सांडू, खय्यम खान, चाऊस अहमद, शेख हुसेन, ईनायत शेर खान, सलाउद्दीन शाह आदींच्या सह्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT