nanded photo 
मराठवाडा

जागतिकीकरणामुळे जग अजून जवळ आले कसे ते वाचा

शिवचरण वावळे

नांदेड : सन १९९१ पूर्वी आणि त्यानंतर जागतिकीक व्यवस्थेचा एकत्रीत अभ्यास केल्यास संस्कृतीमधील संघर्ष, निर्वासितांच्या संख्येत वाढ आणि एका विशिष्ट राज्याचे वर्चस्व निर्माण झाल्याचे दिसून येते. या दरम्यान जागतिकीकरणामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानात आमुलाग्र व नाविण्यपूर्ण सुधारणा झाल्याचे दिसून येते. एकंदरीत जागतिकीकरणामुळे चांगल्या आणि वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले असल्याचे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानवविद्याशाखा विभाग प्रमुख डॉ. भागवत जाधव यांनी व्यक्त केले.

जागतिकीकरणाला सकारात्मक आणि नकारात्मक बाजु 
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीवर्षाच्या निमित्ताने यशवंत महाविद्यालयात शनिवारी (ता.आठ) ‘जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर प्रा. डॉ. भागवत जाधव यांचे व्याख्यान झाले. जागतिकीकरणाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजु आहेत. जागतिकीकरणामुळे सर्वांना देश विदेशातुन ज्ञानाचे धडे घेणे शक्य झाले आहे. त्या सोबतच सर्व सामान्य व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. जागतिकीकरणाचे युग अवतरल्याने जागतिक बँका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, बहुराष्ट्रीय कंपन्या यांना सुद्धा महत्वप्राप्त झाले आहे. जागतिकीकरणामुळे देशभरातील प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याने अर्थव्यवस्थेत मोठीवृद्धी झाली. सोबतच भारतीय वस्तू उत्पादनात देखील सुधारणा झाल्याचेही श्री. जाधव यांनी सांगितले. 

मान्यवरांच्या हस्ते रिसर्च जर्नलचे प्रकाशन
सर्वप्रथम साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दीवर्षाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिडशे शोध प्रबंधाचा संग्रह असलेल्या स्कॉलर रिसर्च जर्नल संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य गणेशचंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी अध्यक्षिय समारोप केला. सुत्रसंचालन प्रा. डॉ. पद्माराणी राव यांनी केले. प्रा. पी. आर. मुठे यांनी आभार मानले.

यांची होती उपस्थिती
शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज संस्थेचे माजी विभागप्रमुख व परिषदेचे बीजभाषक प्रो. डॉ. शंकर चटर्जी, गंगाधर शक्करवार, अर्थशास्त्र विभाग अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. अरुण तवार, प्राचार्य गणेशचंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.आर. मुठे यांची उपस्थिती होती.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

PM Vidyalaxmi Yojana: टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? मग सरकारकडून मिळवा 3% व्याज सवलतीचं शिक्षण कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा!

SCROLL FOR NEXT