file photo 
मराठवाडा

आखाडा बाळापुर ग्रामपंचायतची वसुली मोहीम, पहिल्याच दिवशी एक लाखाची वसुली

सय्यद अतिक

आखाडा बाळापुर ( जिल्हा हिंगोली ) : येथील ग्रामपंचायतने विविध कराची घरपोच वसुली मोहीम सुरु केली असून पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता. नऊ) जवळपास एक लाख रुपयांची वसुली झाली आहे.

कळमनुरी तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या आखाडा बाळापुर ग्रामपंचायतची नळपट्टी, घरपट्टी व विविध कराची लाखो रुपयांची थकबाकी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. यामुळे अनेकदा ग्रामपंचायतला कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, वीज वितरण व पंचवीस गाव पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल भरण्यासाठी अडचणी येत असतात.

सोमवार (ता. आठ) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील बोंढारे, उपसरपंच मोहम्मद जिया कुरेशी यांच्या उपस्थितीत घरपोच वसुली मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये नळपट्टी व घरपट्टीची एकूण ९३ हजार ७०० रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे. मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य हे प्रत्येक वार्डात जाऊन घरोघरी फिरुन ग्रामपंचायतची वसुली करणार असल्याचे सांगण्यात आले. 

यावेळी ग्रामविकास अधिकारी रुद्राजी क्षिरसागर, माजी सरपंच अनिल अमिलकंठवार, अमोल बोंढारे, साईनाथ छत्रे, केशव खुडे, शिवाजी उघडे, शाहबाज कुरेशी, संदीप नरवाडे व ग्रामपंचायत कर्मचारी शिवशंकर सूर्यवंशी, शेख हरुन शेख अन्वर, पप्पू ग्रहपाळ, श्रीकांत पंडित, अमोल बोंढारे, दिलीप सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी घरपोच वसुली मोहिमेत काही ग्राहकांनी नळपट्टी, घरपट्टी पूर्णपणे थकबाकी जमा केली अशा ग्राहकांचा पुष्पगुच्छ देऊन संजय पाटील बोंढारे, जिया कुरेशी यांनी सत्कार केला.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT