covid 19 covid 19
मराठवाडा

'विद्यापीठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयांतील शुल्कांत कपात'

विद्यार्थ्यांद्वारे व वसतिगृहाचा उपयोग करण्‍यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली

संदीप लांडगे

औरंगाबाद: कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कृषी विद्यापीठे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या अनुदानित-विनाअनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या वरिष्ठ महाविद्यालयांतील विविध प्रकारच्या शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (ता.३०) औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषद केली.

राज्यातील विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालयांतील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार आहे. प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांद्वारे व वसतिगृहाचा उपयोग करण्‍यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

आधार हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ
कोरोना काळात बहुतांश शिक्षण हे ऑनलाईनच होते. त्यामुळे पारंपारीक अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी तेथील सुविधांचा वापर केलेला नाही. त्यामुळे खासगी व्यवस्थापनाकडून राज्यात चालवण्यात येणाऱ्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील अनेक प्रकारचे शुल्क कमी केले आहेत. यामध्ये आतापर्यंत इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च यात पूर्ण कपात केली जाणार आहे. ते शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Leader Kolhapur : कोल्हापुरात काँग्रेस नेत्याचा बंगला फोडला, पत्नीवर धारधार शस्त्राने वार; कुरिअर बॉय असल्याचा बहाण्याने रोकड लुटली

चाकणकरांवर टीका, पक्षानं धाडली नोटीस; रूपाली ठोंबरे म्हणाल्या, वेळ खूपच कमी

Latest Marathi News Live Update : रूपाली पाटील ठोंबरे घेणार अजित पवारांची भेट

Leopard Attack : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप तरुणाचा बळी? लोहशिंगवेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Raisin Rate Hike : दिवाळीनंतर बेदाण्याला उच्चांकी दर, एका किलोला तब्बल ४१० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान

SCROLL FOR NEXT