exam
exam 
मराठवाडा

ऑनलाइन नोंदणी केली अन् हाती आले चुकीचे प्रवेशपत्र

संजय कापसे

कळमनुरी ः नवोदय परीक्षेकरिता ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ५४ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र न मिळाल्यामुळे त्‍यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांकडे संबंधितांनी चुकीचे प्रवेशपत्र दिले असल्याचा प्रकारही समोर आला आहे. या प्रकाराबाबत आता संतप्त झालेल्या पालकांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी चालवली आहे.

शहरातील गुलामनबी उर्दू हायस्कूल व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावरून शनिवारी नवोदय चाचणी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षा सुरू झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय परीक्षा केंद्रावर नवोदय परीक्षा मंडळाकडून प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची संख्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जुळत नसल्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. नवोदय परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्राप्त झाल्यानंतर या यादीमध्ये फुले विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांची नावे नसल्याचे उघड झाले.

तिसऱ्या टप्प्यात झाले दुर्लक्ष
या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करताना सुरुवातीचे दोन्ही टप्पे पूर्ण केले. मात्र त्यानंतर संबंधित शिक्षकाकडून तिसरा टप्पा ऑनलाइन करताना झालेले दुर्लक्ष विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे ५४ विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेपासून वंचित रहावे लागले. 

पालकांनी संबंधितांना जाब विचारला
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पालक परीक्षा केंद्रावर जमा झाले. त्यांनी या प्रकाराबाबत संबंधितांना जाब विचारला मात्र, परीक्षा केंद्रावरच पालकवर्ग संजय कावडे, कैलास गुंजकर, दिलीप सूर्यवंशी, लक्ष्मीकांत घुगे, केरबा ठोके, शकुराव गाढे, इब्राहीम खान अकबर खान, बबनराव जाधव, उत्तम कांबळे, किशन वडणे यांच्यासह पालकांनी मुख्याध्यापक श्री. राठोड यांना यासंदर्भात जाब विचारला.

आता न्यायालयीन दाद मागण्याची तयारी
विद्यार्थ्यांकडे परीक्षा पत्र (हॉल तिकीट) नाही तर मग दिलेले हॉल तिकीट कुठल्या आधारावर काढण्यात आले आहे, याबाबत विचारणा केली. याप्रश्नी नवोदय परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या संबंधित शिक्षकाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येऊन त्याच्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही पालकाचे समाधान झाले नाही. त्यांनी या प्रश्नावर आता न्यायालयीन दाद मागण्याची तयारी चालवली आहे. या सर्व प्रकाराबाबत नवोदय परीक्षा मंडळ व शिक्षण विभागाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT