corona recovered
corona recovered corona recovered
मराठवाडा

जगण्याच्या इच्छाशक्तीने कोरोनावर वृद्ध दाम्पत्याची मात

सकाळ वृत्तसेवा

लातूर: जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे येथील एका वृद्ध दाम्पत्याने कोरोना (corona virus) वर मात केली. केवळ १४ दिवसांच्या उपचारानंतर आणि गृह विलगीकरणात राहूनच दिगंबर महाजन (वय ९४) आणि त्यांच्या पत्नी सुमन महाजन (वय ८४) यांनी या कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. (covid 19)

महाजन दाम्पत्याची कोरोना चाचणी १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर रक्तातील विविध चाचण्यांचे आणि एचआरसीटी स्कॅनचे अहवाल, कोविडमुळे शरीरात खूपच संसर्ग झाल्याचे सांगत होते. यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. वयाचा विचार आणि घरातील कोणाशीही संपर्क ठेवता न येणे, या दोन मुख्य कारणामुळे या वृद्ध दाम्पत्यांनी गृह विलगीकरणातच रहावे असा कुटुंबातील सर्वांनी निर्णय घेतला. त्यानंतर वैद्यकीय सल्ला आणि शासकीय औपचारिकता पूर्ण करून लातूर शहर महापालिकेने निर्धारित केलेल्या स्थानिक निर्बंधाचे काटेकोर पालन केले.

परिणामी कोरोना संसर्ग हळू हळू कमी होत गेला. केवळ १४ दिवसांच्या उपचारानंतर आणि गृह विलगीकरणात राहूनच दिगंबर महाजन व त्यांच्या पत्नी सुमन महाजन यांनी या कोरोना विषाणूला शरीरातून हाकलून देण्यात यश मिळविले.

शरीरावर स्वतःच ठेवले लक्ष-
कोरोनात जुनाट आजार असला तर धोका अधिक असतो. मात्र या दम्पत्याने दर दोन तासांनी शरीरातील प्राणवायूची पातळी आणि शरीराचे तापमान यावर स्वतः लक्ष ठेवत एकमेकांची काळजी घेतली. दोघांनीही कोणतेही इंजेक्शन घेतले नाही, हे सर्वात महत्त्वाचे. यात दिगंबर महाजन यांना जुनाट दम्याचा आजार असूनही त्यांनी कोरोनाला पराभूत केले. त्यामुळे कुटुंब चिंतामुक्त होऊन आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कोरोना संदर्भातील आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक बाबींचा प्रादुर्भाव होऊ न दिल्यामुळेच आम्ही सहीसलामत बाहेर पडलो. कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा घेतल्यामुळेच आमची प्रतिकार शक्ती वाढली.
दिगंबर महाजन, सुमन महाजन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT