Aarakshana Rajegore Esakal
मराठवाडा

Maratha Reservation : आरक्षण आंदोलनांची आठवण म्हणून त्यांनी ठेवले मुलींचे नाव 'आरक्षणा'

मराठा आरक्षणाची मागणी राज्यभर सध्या ऐरणीवर आहे. या मागणीसाठी खूप मोठी चळवळ निर्माण झाली असून विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) - मराठा आरक्षणाची मागणी राज्यभर सध्या ऐरणीवर आहे. या मागणीसाठी खूप मोठी चळवळ निर्माण झाली असून विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात आबालवृद्ध, तरुण, विद्यार्थी, महिला सहभागी झाल्या आहेत. एक राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले असून या मागणीसाठी आरपारचा लढा सुरू झाला आहे. या आंदोलनात तरुणांचा सहभाग खूप मोठा आहे. या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी झालेल्या शेलगाव (जिल्हा नांदेड) येथील तरुणाने आपल्या लाडक्या मुलीचे नाव 'आरक्षणा' असे ठेवले आहे.

मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र झाला असून, या लढ्याला साहित्यीक, विचारवंतांनी पाठिंबा दिला आहे. शेलगाव हे शेतकरी चळवळीसाठी जिल्ह्यात ओळखले जाते.या गावातील नागरिक, तरुण, शेतकरी कामगार या आरक्षणाच्या लढाईंत सहभागी झाले आहेत.

कुटुंबात बाळ जन्माला येण्याआधी त्याच्या नावाविषयी चर्चा सुरू होते.कोणी पुर्वजांची आठवण राहावी यासाठी बाळाचं नाव ठेवात तर कोणी ऐतिहासिक, पौराणिक, विविध प्रकारचे नांव ठेवण्यात येतात.शेलगाव येथील आतम राजेगोरे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केल्या काही वर्षांपासून चळवळीत सहभागी आहे.

त्यांचा विवाह गायत्री कंकाळ हिच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला आहे. तो सध्या उपोषणाला बसला आहे. त्यांना सोमवारी (ता ३०) कन्यारत्न झाले आहे. या बाळाचे नाव काय ठेवावे या विषयावर कुटुंबात खूप मोठी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची आठवण राहावी यासाठी त्यांनी मुलीचे नाव 'आरक्षणा' असे ठेवले आहे.

मी गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनात सहभागी झालो आहे. या आंदोलनांची आठवण राहावी यासाठी माझ्या मुलीचे नाव आरक्षणा असे ठेवले आहे. शासनाने मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी आतम राजेगोरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT