WhatsAp 
मराठवाडा

परभणीत कॅनॉलवरील पक्की अतिक्रमणे काढली 

गणेश पांडे

परभणी : महापालिकेने आपली रिंग रोडवरील अतिक्रमण हटाव मोहिम सलग पाचव्या दिवशी देखील सुरूच ठेवली असून सोमवारी (ता.१५) कॅनॉलवरील पक्की बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली.
 
कॅनॉलवरील काही घरांना मोहिमेचा फटका 
महापालिकेने आपल्या पाचव्या दिवशीच्या मोहिमेत शंभर फुटाचा रिंग रोडवर वरील पक्की बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. गेल्या चार दिवसांपासून संरक्षण भिंती, टीन शेड अशी अतिक्रमणे काढली जात होती. परंतू, सोमवारी पक्की बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. उघडा महादेव मंदिर परिसर तसेच रिंग रोडमध्ये येणाऱ्या कॅनॉलवरील काही घरांना या मोहिमेचा फटका बसला. उपायुक्त प्रवीण गायकवाड, सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, विद्युत अभियंता सोहेल खान, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद, न्यायरत्न घुगे, शेख शादाब, श्रीकांत कुरा, विकास रत्नपारखे, लक्ष्मण जोगदंड, उद्यान विभागाचे अथरखान आदींच्या हरितात्या काली मलेरिया व स्वच्छता विभागाचे अनेक कर्मचारी, कामगार या मोहिमेत सक्रिय होते. 

कुटुंबियांवर आपापली घरी सोडून देण्याची वेळ
काही भागात रस्त्यांच्या साईड पट्ट्यामध्ये मुरूम अंथरण्याचे काम सुरू होते तर काही भागात जेसीबीच्या साह्याने मलबा हटवल्या जात होता. उद्यान विभागाच्या वतीने तोडलेली झाडे घेऊन जाण्याचे काम केले जात होते. सायंकाळी रिंग रोडमध्ये येणारे कॅनॉलवरील पक्की बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली. वर्षानुवर्षांपासून कॅनॉलवरील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जागेवर राहणाऱ्या या कुटुंबियांना रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे आपापली घरी सोडून देण्याची वेळ आली. 

बघ्यांची प्रचंड गर्दी 
महापालिकेने रिंग रोडवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्यानंतर या संपूर्ण रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी उसळत आहे. येणारे हे नागरिक त्याच परिसरातील नाहीतर शहरातून देखील येत असून कशा पद्धतीने मोहीम राबवली जात आहे याची पाहणी करीत आहेत. 

आता शहरातील मोहीमेकडे लक्ष 
महापालिकेने रिंग रोडवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली असतानाच शहरात देखील ही मोहीम राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु पालिका शहरात अतिक्रमण हटाव मोहीम केव्हा राबवणार याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. केवळ नाल्यांवरील अतिक्रमणे न हटवता पालिकेने शहरातील आपल्या जागांचा शोध घेऊन त्या देखील ताब्यात घ्याव्यात, अशी भावना देखील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.   

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT